हिमाचल प्रदेशमध्ये मंडी लोकसभा आणि अर्की, फतेहपूर, जुब्बल-कोटखई विधानसभा जागांवर भाजपच्या पराभवानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. एकप्रकारे त्यांनी या पराभवाचे खापर केंद्र सरकारवरच फोडले आहे. ते म्हणाले की, वाढत्या महागाईमुळे राज्यात भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले.bypoll results 2021 himachal cm jairam thakur statement bjp lost due to inflation
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमध्ये मंडी लोकसभा आणि अर्की, फतेहपूर, जुब्बल-कोटखई विधानसभा जागांवर भाजपच्या पराभवानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. एकप्रकारे त्यांनी या पराभवाचे खापर केंद्र सरकारवरच फोडले आहे. ते म्हणाले की, वाढत्या महागाईमुळे राज्यात भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले.
त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचवेळी विरोधकही भाजपच्या विरोधात हल्लाबोल करण्याच्या तयारीत आले आहेत. हिमाचल काँग्रेसचे प्रभारी राजीव शुक्ला म्हणाले की, केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेची स्थिती बिघडवून जनतेचा खिसा लुटण्यास सुरुवात केली आहे.
त्यांच्याकडे दाखवण्यासाठी आकडे नाहीत, जीडीपीचे आकडे खोटे आहेत. पेट्रोल, डिझेल, एलपीजीच्या दरात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता भाजपविरोधातील विरोध वाढत चालला आहे. त्याचा परिणाम यूपी निवडणुकीवरही होणार आहे, असेही ते म्हणाले.
हिमाचलमधील एक लोकसभा आणि 3 विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आहे, तर भाजपला मोठा धक्का बसला आहे. या पोटनिवडणुकीकडे राज्यातील पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणूनही पाहिले जात आहे.
जयराम ठाकूर यांच्यासाठीही धोक्याची घंटा!
पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवाचा थेट परिणाम मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या राजकीय उंचीवर होणार आहे. मुख्यमंत्री मंडी जिल्ह्याचे असून त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पोटनिवडणूक लढवली जात होती. मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेसोबतच त्यांच्या राजकीय भवितव्यावरही संकट अधिक गडद झाल्याचे मानले जात आहे. भाजपने नुकतेच ज्या प्रकारे तीन राज्यांचे मुख्यमंत्री बदलले आणि अशा स्थितीत हिमाचलमधील पराभवामुळे जयराम ठाकूर यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्याचबरोबर 2022च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससाठी चांगले संकेत असून पक्षासाठी वातावरणनिर्मिती करण्याची संधी मिळाली आहे.
bypoll results 2021 himachal cm jairam thakur statement bjp lost due to inflation
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान