वृत्तसंस्था
नवी दिल्ली : फास्टॅगला आता बायबाय करून थेट जीपीएसद्वारे टोल कापण्याची नवी प्रणाली लागू करण्याचा विचार सरकार करत आहे. टोल वसुलीवरून होणारे वाद या माध्यमातून कायमचे निकालात काढण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. Bye bye to Fastag now; Via GPS A new system of toll collection will be implemented
टोल वसुलीमुळे नाक्यावरील लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यातच फास्टॅग नसल्याने दुप्पट टोल आणि त्यानंतर होणारे वाद ही नवी डोकेदुखी ठरत आहे. वाद आणि भांडणं बंद करण्यासाठी केंद्र सरकार आता नवीन प्रणाली आणणार आहे.
लाखो वाहनांमध्ये लावलेले फास्टॅग काढून टाकण्याची शिफारस संसदीय समितीने केली. लवकरच वाहनांचा टोल हा थेट बँक खात्यातून जीपीएसद्वारे वसूल केला जाईल. फास्टॅगचे ऑनलाइन रिचार्ज करण्यासाठी तंत्रज्ञानात पारंगत नसलेल्यांसाठी हे खूप उपयुक्त ठरेल, असे समितीचे म्हणणे आहे. या सूचनेची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे.
संसदेच्या परिवहन आणि पर्यटनविषयक स्थायी समितीचे अध्यक्ष टीजी व्यंकटेश यांनी संसदेत राष्ट्र उभारणीत महामार्गांच्या भूमिकेवर बुधवारी अहवाल सादर केला. यामध्ये टोल वसुलीसाठी जीपीएस आधारित प्रणाली कार्यान्वित करणार असल्याचे नमूद केले आहे.
Bye bye to Fastag now; Via GPS A new system of toll collection will be implemented
महत्त्वाच्या बातम्या
- हिजाबचे समर्थन करीत राहुल गांधी म्हणतात, माँ सरस्वती ज्ञान देताना भेदभाव करीत नाही
- अफगाणिस्तानंतर दिल्ली, नोएडा, जम्मू-काश्मीर भूकंपाच्या धक्क्याने हादरला
- मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दाऊदचा हस्तक, दहशतवादी अबू बकरला भारतात आणणार
- मिनी काश्मीर महाबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी; लिंगमळा; वेण्णालेक भागात हिमकणांचा वर्षाव
- लोणार सरोवर पाहून राज्यपाल भारावले; पर्यटनाला चालना देण्यासाठी विकासाची धरली अपेक्षा