• Download App
    ‘’२०२७ पर्यंत भारत जगातील टॉप-3 अर्थव्यवस्थांमध्ये असेल’’, राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला विश्वास! By 2027 India will be among the top 3 economies in the world Rajnath Singh expressed his belief

    ‘’२०२७ पर्यंत भारत जगातील टॉप-3 अर्थव्यवस्थांमध्ये असेल’’, राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला विश्वास!

    भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सरकारला मदत करण्याचे तरुणांना केले आवाहन

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :  भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सरकारला मदत करण्याचे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तरुणांना केले आहे. राजनाथ सिंह शनिवारी बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील गोपाल नारायण सिंह विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करत होते. ते म्हणाले की, हा दीक्षांत समारंभ आहे, शिक्षण सोहळा नाही. शिक्षणातून ज्ञान मिळते, तर दीक्षेतून संस्कृती मिळते. By 2027 India will be among the top 3 economies in the world Rajnath Singh expressed his belief

    याशिवाय राजनाथ सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशातील तरुणांनी नवीन कल्पना घेऊन पुढे यावे आणि भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सरकारला मदत करावी. संरक्षण मंत्री पुढे म्हणाले की, आज आपला भारत खूप वेगाने पुढे जात आहे. भारत जगातील पहिल्या ५ अर्थव्यवस्थांमध्ये सामील झाला आहे. मॉर्गन स्टॅन्लेने म्हटले आहे की २०२७ पर्यंत भारताची गणना जगातील पहिल्या ३ अर्थव्यवस्थांमध्ये केली जाईल.

    आणखी काय म्हणाले राजनाथ सिंह?

    राजनाथ सिंह म्हणाले की, आज देशातील १२ कोटी घरांमध्ये नळांद्वारे पाणी पोहोचले आहे. सन २०१४ मध्ये सुमारे १८ हजार गावांमध्ये वीज नव्हती. आज प्रत्येक घरात वीज पोहोचली आहे. ते म्हणाले की, एकदा स्वामी विवेकानंद अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. तिथे स्वामीजींचा पेहराव पाहून एका व्यक्तीने त्यांना विचारले, स्वामीजी, तुम्हीही सज्जन दिसावेत म्हणून कपडे का बदलत नाहीत. ते म्हणाले होते की, तुमच्या देशात सज्जन माणूस त्याच्या कपड्यांवरून ओळखला जातो, पण माझ्या देशात सज्जन त्याच्या कपड्यांवरून नाही, तर त्याच्या चारित्र्यावरून ओळखला जातो.

    “लोकांना सोबत घेतले पाहिजे” –

    तुम्ही कितीही जाणकार असलात तरी लोकांना सोबत घेतले पाहिजे, असेही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. आपले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी म्हणायचे की कोणीही लहान मनाने मोठा होत नाही आणि तुटलेल्या मनाने कोणीही उभा राहत नाही. लहान मनाच्या माणसाला ना सन्मान मिळतो, ना काही योगदान देता येतं.

    By 2027 India will be among the top 3 economies in the world Rajnath Singh expressed his belief

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!