वृत्तसंस्था
नवी दिल्ली : बी व्ही. नागरत्नम्मा यांच्या रूपाने भारताला पहिल्या महिला सरन्यायाधीश मिळणार आहेत. सध्या त्या कर्नाटक हायकोर्टमध्ये अतिरिक्त न्यायाधीश आहेत. विद्यमान सरन्यायाधीश रामन्ना यांच्या नेतृत्वाखाली सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या पॅनेलने नऊ न्यायाधीशांच्या कॉलेजियमची शिफारस केली असून यामध्ये बी. व्ही. नागरत्नम्मा यांचे नाव आहे.
त्या साधारण महिनाभरासाठी भारताच्या सरन्यायाधीश राहतील. नागरत्नम्मा यांना घराण्यातूनच कायदे शिक्षण परंपरा आली आहे. त्यांचे वडील इ. एस. वेंकटरमय्या हे भारताचे सरन्यायाधीश होते. BV. Nagrathnama pitched to be the first woman chief justice of india
नागरत्नम्मा यांची कर्नाटकच्या हायकोर्टात 2008 मध्ये हंगामी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर दोनच वर्षांमध्ये त्यांना हायकोर्टाचे कायमचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती मिळाली. सरन्यायाधीश रामन्ना यांच्या नेतृत्वाखालील सुप्रिम कोर्टाच्या न्यायाधिशांनी नऊ न्यायाधिशांची कॉलेजियममध्ये शिफारस केली आहे, यात बी. व्ही. नागरत्नम्मा यांचे नाव आघाडीवर आहे. याखेरीज अन्य दोन महिला न्यायाधीशांची नावेदेखील कॉलेजियममध्ये शिफारस करण्यात आली आहेत. यामध्ये न्यायमूर्ती हिमा कोही न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांचाही समावेश आहे. याखेरीज न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओक, न्यायमूर्ती सि. टी. माहेश्वरी यांचाही यांच्याही नावाची शिफारस करण्यात आली आहे.
रामन्ना त्यांच्या आधीचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी महिला सरन्यायाधीश व्हावी, असे मत व्यक्त केले होते. कायदा क्षेत्रातले महिलांचे काम अव्वल दर्जाचे आहे. त्यांना लवकरच भारताच्या सरन्यायाधीश पदाचा सन्मान मिळू शकतो, असे वक्तव्य त्यांनी आपल्या निवृत्तीच्या वेळेला केले होते. आता ते सत्यात उतरताना दिसत आहे.
BV. Nagrathnama pitched to be the first woman chief justice of india
महत्वाच्या बातम्या
- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या
- शबरीमला मंदिरात वडिलांसोबत दर्शनास जाण्याची अल्पवयीन मुलीला परवानगी
- मराठवाड्यात सर्वदूर बरसल्या श्रावणधारा, पावसामुळे पिकांना मिळाले जीवदान
- महाराष्ट्र ठरले एक कोटी जनतेला दोन्ही डोस देणारे देशातील पहिले राज्य
- राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाईल