विशेष प्रतिनिधी
मुंबई : कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेले पद्द पुरस्कार अक्षरश: विकले जात होते. येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांनी प्रियंका गांधी यांच्याकडून एम. एफ.हूसेन यांचे एक पेंटींग विकत घेतले तर त्यांना पद्म पुरस्कार मिळेल, असा सौदा कॉँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. स्वत: राणा कपूर यांनी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात हा आरोप केला आहे.Buy painting from Priyanka Gandhi and get Padma Award, Congress leaders struck a deal with Rana Kapoor of Yes Bank
9 आणि 10 मार्च 2020 रोजी ईडीने नोंदवलेल्या जबाबात राणा कपूर यांनी म्हटले आहे की, प्रियांका गांधी वड्रा यांच्याकडून एमएफ हुसेन पेंटिंग विकत घेण्यास त्यांना भाग पाडण्यात आले होते. त्या बदल्यात त्यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याचे वचन दिले होते. हा सौदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांनी केला होता.
हे पेंटींग खरेदी केल्यानंतर काही आठवड्यांनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार दिवंगत अहमद पटेल यांनी राणा कपूर यांच्या ‘चांगल्या कामाचे’ कौतुकही केले होते. त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मानासाठी योग्य विचार केला जाईल असे सांगितले होते.
या सौद्यासाठीचे पेपरवर्क, पैशाची घेवाण आणि पेंटिंग सोपवण्याचे काम प्रियांका गांधी यांच्या नवी दिल्लीतील कार्यालयात झाले होते. विशेष म्हणजे या वेळी प्रियंका गांधीही उपस्थित होत्या. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे हुसेन यांनी काढलेले हे पेंटींग होते.
ईडीने डिसेंबर 2019 मध्ये राणा कपूर, त्यांची पत्नी, मुली, दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉपोर्रेशन लिमिटेड चे प्रवर्तक कपिल वाधवान आणि येस बँकेच्या अधिकाऱ्यांवर विरुद्ध लखनौ पोलिसांनी नोंदवलेल्या फसवणुकीच्या प्रकरणाच्या आधारे मनी लाँड्रिंगची कारवाई सुरू केली.
Buy painting from Priyanka Gandhi and get Padma Award, Congress leaders struck a deal with Rana Kapoor of Yes Bank
महत्त्वाच्या बातम्या
- हनीट्रॅपर रेणू शर्मा हिला आणखी दोन दिवस पोलीस कोठडी ब्लॅकमेलिंग आणि खंडणी मागणी प्रकरण
- Navneet Rana : राणा दांपत्याचा जामीन घेण्यास नकार, पण नारायण राणे – फडणवीसांना “साद”!!
- शिवसेनेचे हिंदुत्व कसले गदाधारी?, उद्या त्यांच्या हातात झाडू येईल; नारायण राणेंचा टोला!!
- राणा दाम्पत्याची थेट मुख्यमंत्र्यांविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार; कटकारस्थान चिथावणीचे आरोप!!