• Download App
    डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 'या' पदांसाठी होणार बंपर भरती ; दरमहा १.६० लाख रुपये कमवण्याची संधी Bumper recruitment for 'this' posts in Dedicated Freight Corridor Corporation of India Limited; Opportunity to earn Rs 1.60 lakh per month ; read more

    डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये ‘या’ पदांसाठी होणार बंपर भरती ; दरमहा १.६० लाख रुपये कमवण्याची संधी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, डीएफसीआयएलने कार्यकारी व इतर पदांसाठी अर्ज मागविले आहेत. यासाठी पात्र उमेदवार डीएफसीसीआयएलच्या dfccil.com अधिकृत वेबसाइटवर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. दरम्यान, २४ एप्रिल २०२१ पासून अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ मे २०२१ आहे. Bumper recruitment for ‘this’ posts in Dedicated Freight Corridor Corporation of India Limited; Opportunity to earn Rs 1.60 lakh per month ; read more

    अर्जदाराकडे विविध पदांसाठी विहित शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता आहे. कागदपत्र पडताळणी / मुलाखतीच्या वेळी उमेदवारांना गुणपत्रके आणि पदवी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल. शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा पदांनुसार वेगळी ठेवण्यात आली आहे. तसेच, दहावीनंतर आयटीआय अभ्यासक्रम झालेल्या विद्यार्थ्यांकरिता विद्याशाखेत पदविका, कोणत्याही विषयातून सामान्य पदवी, एमबीए किंवा पीजीडीएम आणि अभियांत्रिकी पदवीची पदे रिक्त आहेत.



    कोणत्या पदासाठी किती पगार मिळेल?

    कनिष्ठ व्यवस्थापक – दरमहा ५० हजार ते १.६० लाख रुपये

    कार्यकारी – दरमहा ३० हजार ते १.२० लाख रुपये

    कनिष्ठ कार्यकारी – दरमहा २५ हजार ते ६८ हजार रुपये

    हे मूलभूत वेतन आहे. शिवाय केंद्रीय वेतनश्रेणीनुसार तुम्हाला इतर भत्त्यांबरोबर दरमहा चांगला पगारही मिळू शकतो.

    अर्ज फी : कनिष्ठ व्यवस्थापकासाठी १००० रुपये, कार्यकारी ९०० आणि कनिष्ठ कार्यकारी पदासाठी ७०० रुपये आहे. सामान्य, ओबीसी एनसीएल आणि आर्थिक कमजोर वर्गाला अर्ज फी भरावी लागणार आहे. मात्र, एससी, एसटी, दिव्यांग आणि माजी कर्मचार्‍यांसाठी अर्ज फी विनामूल्य असेल.

    अशी होईल निवड : संगणक परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. सीबीटीच्या दोन-तीन सत्रांत दोन तासात ही परीक्षा असेल. पात्र होण्यासाठी उमेदवारांना प्रत्येक चाचणीत कमीत-कमी ४२ गुणांची टी-स्कोअर करावी लागेल. पात्रता, रिक्त पदांची उपलब्धता आणि आरक्षणाच्या नियमांनुसार, मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी शॉर्टलिस्टेड उमेदवारांना बोलावण्यात येईल.

    ‘या’ पदांसाठी होणार भरती

    • कनिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल) – ३१
    • कनिष्ठ व्यवस्थापक (ऑपरेशन्स आणि बीडी) – ७७
    • कनिष्ठ व्यवस्थापक (मेकॅनिकल) – ०३
    • कार्यकारी (सिव्हिल) – ७३
    • कार्यकारी (विद्युत) – ४२
    • कार्यकारी (सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन) – ८७
    • कार्यकारी (ऑपरेशन्स आणि बीडी) – २३७
    • कार्यकारी (यांत्रिकी) – ०३
    • कनिष्ठ कार्यकारी (विद्युत) – १३५
    • कनिष्ठ कार्यकारी (सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन) – १४७
    • कनिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल) – ३१
    • कनिष्ठ व्यवस्थापक (ऑपरेशन्स आणि बीडी) – ७७
    • कनिष्ठ व्यवस्थापक (मेकॅनिकल) -०३
    • कार्यकारी (सिव्हिल) – ७३
    • कार्यकारी (विद्युत) – ४२
    • कार्यकारी (सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन) – ८७
    • कार्यकारी (ऑपरेशन्स आणि बीडी) – २३७
    • कार्यकारी (यांत्रिकी) – ०३
    • कनिष्ठ कार्यकारी (विद्युत) – १३५
    • कनिष्ठ कार्यकारी (सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन) – १४७

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य