वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दंगलग्रस्त जहांगीरपुरी विभागात आज गुरुवार आणि उद्या शुक्रवारी बुलडोझर चालणार असून त्यासाठी परिसरात जादा पोलीस तैनात करण्यात आले आहे. उत्तर दिल्ली महापालिकेने आज आणि उद्या जहांगीरपुरी परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई करण्याचे निश्चित केले असून तसे पत्र दिल्ली पोलिसांना पाठवले आहे. परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 400 पोलिसांना दोन दिवसांसाठी जहांगीरपुरी तैनात करावे, अशी मागणी या पत्रात महापालिका अधिकाऱ्यांनी केली आहे. Bulldozers will run on encroachments in riot-hit Jahangirpuri today and tomorrow
हनुमान जयंतीला याच जहांगीरपुरी परिसरात समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली होती. त्यानंतर तेथे दंगल उसळली होती. या दंगलीतील मुख्य आरोपी मोहम्मद अन्सार मस्ती गेली नसून त्याने रोहिणी कोर्टात जाताना पुष्पा स्टाईल ॲक्शन केली होती. पोलिसांनी त्याची हेकडी काढली आहे.
मात्र, अजूनही जहांगीरपुरी परिसरात तणाव असून पोलिसांनी गेले दोन दिवस बंदोबस्त वाढवून शांती मार्चदेखील काढला आहे. आता उत्तर दिल्ली महापालिकेचे बुलडोझर जहांगीरपुरी भागातील अतिक्रमणांवरून फिरणार आहेत.
दंगलीतील आरोपी यांच्या घरांवर बुलडोझर फिरवून येत अशी मागणी करणारा अर्ज जमियात उलमा ए हिंद या संघटनेत सुप्रीम कोर्टात केला आहे. दंगलीतील आरोपींना मानवाधिकार जपावेत त्यांच्या डोक्यावरचे ज्योत शोध काढून घेऊ नये असे या अर्जात म्हटले आहे त्याच वेळी ट्विटर वर सध्या #StopBulldozingMuslimHouses हा हॅशटॅग ट्रेंड केला जात आहे.
Bulldozers will run on encroachments in riot-hit Jahangirpuri today and tomorrow
महत्त्वाच्या बातम्या
- गतिमान नेतृत्वामुळेच भारताने केली कोविडच्या संकटावर मात, बांग्ला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक
- भाजप विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्यात ममताच योग्य, कॉँग्रेस आपसांत भांडून भाजपला वाढवतेय, रिपून बोरा यांचा घरचा आहेर
- दिल्ली हिंसाचाराचा सूत्रधार मोहम्मद अन्सार आपचा कार्यकर्ता, भाजपाचा आरोप
- अपयश झाकण्यासाठीच सत्ताधारी-विरोधकांची चिखलफेक, राजू शेट्टी म्हणतात तुमचा खेळ होतो, लोकांचा जीव जातो