केंद्रीय तपास संस्था सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडी, सीबीआय, एनआयए यांच्या कठोर कायदेशीर कारवाया अजिबात थांबणार नाहीत. कोणीही कितीही आणि कोणत्याही मुद्द्यावर वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला, तरी केंद्रीय तपास संस्थांच्या कारवाया थंड पडणार नाहीत, असाच खणखणीत आणि गंभीर इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या दिल्लीतल्या भाषणातून महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारला दिल्याचे स्पष्ट झाले आहे.Bulldozers of Central Investigation Agency will enter Maharashtra
आजचे सगळे मोदींचे भाषण हे घराणेशाही विशेषत: प्रादेशिक घराणेशाही मोडून काढण्यावर केंद्रित झाले होते. जनतेचा हवाला देत पंतप्रधान मोदींनी जर जनतेने आपल्यावर विश्वास दाखवला असेल तर राजकीय घराण्यांचा भ्रष्टाचार मोडून काढण्याची जबाबदारी आपली आहे, असे सांगत त्यांनी केंद्रीय तपास संस्थांचा वरवंटा थांबणार नसल्याचे सूचक पद्धतीने नाही तर थेटच स्पष्ट केले. किंबहूना 2024 च्या निवडणुकीचे टार्गेटच त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांसमोर स्पष्टपणे ठेवले. प्रादेशिक घराणेशाहीचा बिमोड हा 2024 च्या निवडणुकीचा मोटो असणार आहे. आणि त्यापूर्वी प्रादेशिक घराणेशाहीच्या पक्षांनी जातिवाद – धर्मवाद – प्रांतवाद असे कोणतेही वाद आणून केंद्रीय तपास संस्थांचा तपास आणि चौकशीत अडथळा आणला तर त्याची अजिबात गय केली जाणार नाही, असा इशारा मोदींनी आज स्पष्टपणे दिलेला दिसतो.
उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी गुंड माफियागिरी विरुद्ध बुलडोझर चालवला. या नंतर महाराष्ट्राचा नंबर येऊ शकतो असेच पंतप्रधानांनी सूचक पद्धतीने सांगितले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार गेल्या दोन वर्षांपासून केंद्रीय तपास संस्था विरोधात जोरदार हल्लाबोल करताना दिसते आहे. आज उत्तर प्रदेशसह चार राज्यांच्या निवडणुकांच्या विजयी मेळाव्यात पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय तपास संस्थांच्या कठोर कायदेशीर कारवायांवर प्रथमच भाष्य करून महाराष्ट्रातले ठाकरे – पवार सरकार आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार यांना गंभीर इशारा दिला आहे.
उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवल्यानंतर नवी दिल्लीत भाजप मुख्यालयात झालेल्या विजयी मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रादेशिक पक्षांची घराणेशाही आणि भ्रष्टाचार यावर प्रखर हल्लाबोल केला. त्याच वेळी त्यांनी केंद्रीय तपास संस्थांच्या कारवाईचे जोरदार समर्थन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की या देशातले अनेक राजकीय विद्वान उत्तर प्रदेशासारख्या राज्याला कायम जातिवादाच्या चष्म्यातून पाहत होते. जातिवादाच्या पलिकडे त्यांचे विश्लेषण जात नव्हते. पण आता उत्तर प्रदेशातल्या जनतेने विशेषत: या महिलांनी आणि तरुणांनी जातीच्या पलिकडे जाऊन मतदान केले आहे आणि त्यांनी भाजपला विजयी केले आहे. आता ही देशातल्या विद्वानांची जबाबदारी आहे की त्यांनी जातिवादाचे चष्मे उतरवून विजय अथवा पराजय याचे विश्लेषण केले पाहिजे.
YOGI ADITYANATH:हिंदूचं घर जळणार तेव्हा मुसलमानचं घर थोडी सुरक्षित राहणार : योगी आदित्यनाथ
याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रादेशिक राजकीय घराणेशाहीवर जोरदार प्रहार केला. केंद्रीय तपास संस्था भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी पुढे येतात. त्या नि:पक्षपाती संस्था असताना देखील प्रादेशिक घराणेशाहीतले लोक या संस्थांच्या विरुद्ध वेगवेगळ्या पद्धतीचे वातावरण तयार करतात. त्याला जातिवादाचा, धर्मवादाचा, प्रांतवादाचा रंग देतात. पण भ्रष्टाचाराचा बीमोड करण्यासाठी आम्ही 100 % केंद्रीय तपास संस्थांच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी दिली.
– घराणेशाहीचा भ्रष्टाचार मोडा
राजकीय घराणेशाहीचे लोक हजारो कोटींचा भ्रष्टाचार करतात आणि भ्रष्टाचार लपवण्यासाठी जात – धर्म – प्रांत या मुद्द्याचा आधार घेऊन केंद्रीय तपास संस्था आणि न्यायालयाच्या नि:पक्षपातीपणा विरुद्ध आवाज उठवत राहतात. यामध्ये त्यांना देशातल्या राजकीय विश्लेषक विद्वानांची देखील साथ मिळताना दिसते. यावर देखील मोदींनी हल्लाबोल केला.
– जातिवादा पलिकडचे यश
भाजपचा विजयाचे रहस्य जातिवादाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांच्या कल्याणकारी योजना राबवल्या मध्येच आहे. देशातल्या युवा शक्तीचा विधायक वापर करून त्यांना संधी देण्यात आहे, हे भारतातल्या राजकीय विद्वानांच्या लक्षात येत नाही किंवा लक्षात आले तरी ते मांडत नाहीत. ते प्रादेशिक पक्षांच्या घराणेशाहीच्या चष्म्यातूनच आणि जातिवादाच्या मानसिक तेथूनच विजय किंवा पराभवाकडे बघतात, असे शरसंधान पंतप्रधान मोदींनी केले.
– योजनांची यशस्विता
उत्तर प्रदेशासह चार राज्यांमध्ये केंद्रातल्या योजना यशस्वी झाल्या. सर्वसामान्यांचे जीवन सुकर झाले आणि म्हणूनच जनतेने भाजपला एवढे भरभरून मतदान केले, याकडे त्यांनी आवर्जून लक्ष वेधले. भाजपच्या विजयात महिलांचा युवकांचा सर्वात मोठा वाटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशात 2022 च्या निकालांनी 2024 ची वाट मोकळी केली आहे असेही ते म्हणाले.
Bulldozers of Central Investigation Agency will enter Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
- UP, Goa Elections : ठाकरे – पवार; स्टार प्रचारकांचा ना दिसला प्रचार, ना पडला प्रभाव…!!
- Uttarakhand Election Results 2022 Live Updates : भाजप प्रचंड बहुमताने आघाडीवर …मात्र तीनही मुख्यमंत्री पिछाडीवर…
- U. P. Punjab Elections : हातातले कसे गमवावे, हे राहुल – प्रियांका गांधींकडून शिकावे…!!
- मणीपूरमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येणार; २५ जागांवर घेतली आघाडी
- UP ELECTION RESULTS 2022LIVE : रायबरेली-काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या अदिती सिंह पुढे-जाणून घ्या अपडेट्स…