वृत्तसंस्था
पंचमहाल : भारतभरात सगळीकडे बुलडोजरच्या दणकेबाज कारवाईचा बोलबाला सुरू असताना ब्रिटिश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यावर देखील “बुलडोजर फिवर” चढल्याचे दिसून आले आहे.Bulldozer: British Prime Minister Boris Johnson gets “Bulldozer Fever”
बोरीस जॉन्सन यांनी आज भारताच्या दौऱ्यावर गुजरात मध्ये जेसीबी फॅक्टरीला भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासमवेत जेसीबीचे चेअरमन लॉर्ड बेडफॉर्ड, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि अन्य वरिष्ठ अधिकारी होते. बोरीस जॉन्सन यांनी गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यातील हलोल येथील जेसीबी फॅक्टरीला भेट दिली. त्यावेळी त्यांनी जेसीबी वर चढून फोटोला पोज देखील दिली. जेसीबीच्या ड्रायव्हर सीटवर ते बसले. बोरीस जॉन्सन यांचे हे फोटो आणि व्हिडिओ भारतात सोशल मीडियावर हिट झाले आहेत.
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुंड -:माफियांच्या मालमत्तांवर बुलडोजर चालवल्यामुळे बुलडोजर हे राजकीय प्रतीक फेमस झाले. त्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी देखील गुंड माफियांच्या मालमत्तांवर बुलडोजर चालवला.
काल जहांगीरपुरी मध्ये अमित शहा यांनी अतिक्रमणांवर बुलडोजर चालवून घेतला. त्यामुळे आत्तापर्यंत भारतात “बाबा का बुलडोझर” त्यानंतर “मामा का बुलडोझर” तसेच दिल्लीत चाललेला अमित शहा यांचा बुलडोजर हे प्रसिद्ध झाले. आता त्यापाठोपाठ बोरीस जॉन्सन हे “बुलडोजर मॅन” झाले आहेत.
भारतात गुंड – माफियांविरोधात आणि अतिक्रमणाविरोधात चाललेल्या बुलडोजर कारवाईचा ब्रिटीश पंतप्रधानांनी देखील आपली प्रसिद्धी वाढवून घेण्यासाठी चपखल उपयोग करून घेतल्याचे यातून दिसून आले आहे.
Bulldozer: British Prime Minister Boris Johnson gets “Bulldozer Fever”
महत्त्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेंना ब्लॅकमेलिंग करणाऱ्या रेणू शर्माला अटक मुंबई क्राईम ब्रँचमध्ये खंडणी मागितल्याची तक्रार
- Jahangirpuri bulldozer : जहांगीरपुरीतले “राजकीय पर्यटन”, पण दगडफेक आणि हिंसाचारानंतर नव्हे, तर बुलडोजर कारवाईनंतर!!
- Thackeray – Sule : महाराष्ट्रात शिवीगाळीनंतर गाजू लागलेय सोय – सुपारी – चांदीचे ताट…!!
- अमाेल मिटकरींच्या वक्तव्यावरुन पुण्यात वाद; राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमाेर ब्राम्हण महासंघाचे कार्यकर्ते भिडले