• Download App
    मीरा रोडच्या नया नगरमध्ये बुलडोझरची धडक कारवाई, दंगलखोरांची बेकायदा बांधकामे उद्ध्वस्त!!|Bulldozer attack in Naya Nagar of Mira Road, illegal constructions of rioters destroyed!!

    मीरा रोडच्या नया नगरमध्ये बुलडोझरची धडक कारवाई, दंगलखोरांची बेकायदा बांधकामे उद्ध्वस्त!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अयोध्येत राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मीरा रोड परिसरात त्याचे हिंसक पडसाद उमटले हिंदूंच्या शोभा यात्रेवर मुस्लिम गुंडांनी हल्ला केला त्याच मीरा रोड नया नगर परिसरात शिंदे फडणवीस सरकारने आज बुलडोझरची धडक कारवाई केली. परिसरातील सगळी बेकायदा बांधकामे बुलडोझरने उद्ध्वस्त करून तो परिसर सपाट केला.Bulldozer attack in Naya Nagar of Mira Road, illegal constructions of rioters destroyed!!

    मीरा रोड येथील नया नगर परिसरात बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणे बुलडोझरने उद्ध्वस्त केली. शिंदे – फडणवीस सरकारच्या सूचनेनंतर पोलिसांच्या मदतीने महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने ही कारवाई केली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीरा रोड परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत ही मोठी कारवाई केली आहे.



    बुलडोझरची कारवाई-

    बेकायदा बांधकामे पाडून सपाट करण्याचे काम सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून जवानांचा फौजफाटा घटनास्थळी तैनात आहे. पोलिसही घटनास्थळी फ्लॅग मार्च काढत आहेत. या परिसरात जे काही बेकायदा बांधकाम आहे ते पोलीस प्रशासन पाडत आहे.

    घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोकांची गर्दी होऊ नये म्हणून जवळच्या सोसायटीचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

    श्री राम शोभा यात्रा मीरा रोडच्या नया नगर परिसरातून जात असताना झालेल्या हाणामारीत सोमवारी रात्रीपर्यंत पोलिसांनी १३ हून अधिक लोकांना अटक केली होती. पोलिसांनी सांगितले की, जमावाने मिरवणुकीवर दगडांनी हल्ला केला, यात भगवे झेंडे असलेल्या कार आणि दुचाकींचा समावेश होता, या दगडफेकीत काही लोक जखमी झाले.

    Bulldozer attack in Naya Nagar of Mira Road, illegal constructions of rioters destroyed!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!