वृत्तसंस्था
मुंबई : झोपडपट्टी परिसरात असलेल्या इमारतीत राहणाऱ्यांना कोरोना, ओमीक्रोनचा धोका अधिक असल्याचे मुंबई महापालिकेच्या लक्षात आले आहे. विशेष म्हणजे येथे जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाययोजना केल्या जात असून सोसायट्यांसाठी नवी नार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
Buildings in slum areas are at higher risk of corona infection; Guidelines issued
२० टक्केपेक्षा जास्त रुग्ण आढळले तर इमारत सील करण्याची प्रक्रिया वॉर्ड स्तरावर केली जाईल, जास्त धोका असलेल्या लोकांना ७ दिवस सक्तीने क्वारंटाईन करावे लागेल, ५ व्या आणि ७ व्या दिवशी त्यांची कोरोना चाचणी करावी लागेल.
सोसायटी मॅनेजिंग कमिटी क्वारंटाईन केलेल्या कुटुंबासाठी रेशन, औषध आणि इतर आवश्यक साहित्य पुरवेल. इमारत सील करण्याची प्रक्रिया प्रभाग स्तरावर केली जाणार आहे. कोरोनाबाबत वैद्यकीय अधिकारी किंवा वॉर्ड ऑफिसर यांनी जारी केलेले प्रोटोकॉल आणि प्रतिबंधात्मक नियमांचे लोकांना काटेकोरपणे पालन करावे लागेल.
कोरोनाबाबत वैद्यकीय अधिकारी किंवा वॉर्ड ऑफिसर यांनी जारी केलेले प्रोटोकॉल आणि प्रतिबंधात्मक नियमांचे लोकांना काटेकोरपणे पालन करावे लागेल.
रुग्णालयांना सूचना
- रुग्णालयांनी ८० % कोविड बेड आणि १०० ICU बेड असलेले वॉर्ड वॉर रूम उघडावे
- या वॉर्ड रूम आरक्षित असतील आणि BMC च्या परवानगीशिवाय येथे प्रवेश दिला जाणार नाही
- सर्व खाजगी रुग्णालये रुग्णांकडून फक्त सरकारने निश्चित केलेले दर आकारतील.
- आता सर्व खाजगी रुग्णालयांना कोणत्याही कोविड रुग्णाला दाखल करण्यापूर्वी BMC ची परवानगी घ्यावी लागेल.
Buildings in slum areas are at higher risk of corona infection; Guidelines issued
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई एनसीबीच्या विभागीय संचालकपदी विजेंद्र सिंह यांची नियुक्ती
- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनाही कोरोनाची लागण; ट्वीट करत याबाबत माहिती
- HOME ISOLATION : केंद्र सरकारकडून होम आयसोलेशनचे नवीन नियम जाहीर – जाणून घ्या सविस्तर
- PURANDAR AIRPORT : महाविकासआघाडी सरकारला धक्का! संरक्षण मंत्रालयाकडून पुरंदर विमानतळाच्या जागेची मान्यता रद्द
- “आमच्यावर होणाऱ्या वैयक्तिक आरोपांना उत्तर देत बसू नका , तर …..” ;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे