विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्प मांडला असला तरी त्यामध्ये देखील मोदी सरकारच्या मूलभूत धोरणानुसार महिला केंद्रित तरतुदींवर भर दिला आहे. Budget 2024 Women : Special emphasis on women centric provisions in interim budget too!!
देशात गरीब, युवक, महिला आणि शेतकरी या चारच जाती आहेत आणि त्यांचे कल्याण यातच देशाचे खरे कल्याण आणि विकास आहे हे मोदी सरकारचे मूलभूत राजकीय आणि सामाजिक धोरण आहे. या धोरणाला अनुसरूनच केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने आत्तापर्यंत विविध कल्याणकारी योजनांच्या घोषणा आणि तरतुदी केल्या आहेत.
लोकसभा निवडणूक 2024 पूर्वीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या चार जातींवर भर देत विविध तरतुदी केले आहेत त्यातही प्रामुख्याने महिला केंद्रित तरतुदींवर विशेषत्वाने भर दिला आहे.
निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात महिलांसाठी अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. यामध्ये आतापर्यंत महिलांसाठी केलेल्या कामाचा लेखा जोखा वाचला तसेच भविष्यात महिलांविषयी कोणत्या गोष्टींवर भर दिला जाणार आहे त्याबाबत सांगितले.
- आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांना पंतप्रधानांच्या स्वप्नातील आयुष्यमान भारत योजनेचे सर्व लाभ देण्यात येणार आहेत
- सरकारी प्रयत्नामुळे महिलांची उद्योजकता 24 % वाढवली गेली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
- पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 70 % महिलांना घरे दिल्याने त्यांचा सन्मान वाढला आहे.
- 1 कोटी महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ मिळाला आहे हा आकडा 3 कोटी महिलांपर्यंत नेला जाणार आहे.
- सर्व्हायकल कँसरबाबत 9 ते 14 वर्ष वयोगटातील महिलांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.
- गेल्या दशकात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) अभ्यासक्रमांमध्ये महिलांची नोंदणी 28 % वाढली आहे.
- तीन तलाक प्रथेला बेकायदेशीर ठरवून महिला सुरक्षितता आणि सन्मानात वाढ केली आहे.
- महिलांसाठी लोकसभा आणि विधानसभेमध्ये एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महिला सक्षमीकरणाचे हे सर्वांत महत्त्वाचे पाऊल आहे.
Budget 2024 Women : Special emphasis on women centric provisions in interim budget too!!
महत्वाच्या बातम्या
- केजरीवाल म्हणाले- भाजप ट्रम्पप्रमाणे सत्तेला चिकटून राहणार; लोकसभेत हरल्यानंतरही जागा सोडणार नाही
- मद्रास हायकोर्टाचा आदेश- मंदिर हे पिकनिक स्पॉट नाही; बिगर हिंदूंच्या प्रवेशावर बंदी, मंदिराच्या गेटवर नो एन्ट्री बोर्ड लावण्याचे निर्देश
- INDI आघाडी बंगालमध्ये ममतांनी तोडली; केरळात डाव्यांनी फोडली; उत्तर प्रदेशात अखिलेशने मोडली!!