• Download App
    अर्थसंकल्प 2024 : मध्यमवर्गीयांना सरकारची मोठी भेट, भाड्याच्या घरात राहणाऱ्यांसाठी 'ही' योजना सुरूBudget 2024 Governments big gift to the middle class scheme launched for those living in rented houses

    अर्थसंकल्प 2024 : मध्यमवर्गीयांना सरकारची मोठी भेट, भाड्याच्या घरात राहणाऱ्यांसाठी ‘ही’ योजना सुरू

    पंतप्रधान आवास योजना-शहरी आणि प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण योजना या आधीपासून मोदी सरकार चालवत आहेत

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा अंतिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी सादर केला. हा अंतरिम अर्थसंकल्प असल्याने, त्यात फार मोठ्या घोषणा नसल्या तरी सरकारने गरीब आणि मध्यमवर्गीयांना निश्चितच दिलासा दिला आहे. Budget 2024 Governments big gift to the middle class scheme launched for those living in rented houses

    अशीच एक भेट म्हणजे आमचे घर होय, 2024 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, सरकार भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांसाठी तसेच झोपडपट्ट्यांमध्ये किंवा अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी स्वतःची घरे खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी एक गृहनिर्माण योजना सुरू करेल.

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 च्या अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पात ही घोषणा केली. गुरुवारी केलेल्या या घोषणेमध्ये सरकार ‘सर्वांसाठी घरे’ मिशनवर काम करणार आहे. पंतप्रधान आवास योजना-शहरी आणि प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण योजना या आधीपासून मोदी सरकार चालवत आहेत. याअंतर्गत सर्वांसाठी घरे योजनाही सुरू करण्यात येणार आहे.

    अर्थसंकल्पीय भाषणात मंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की सरकार मध्यमवर्गासाठी नवीन योजना बनवत आहे. त्या म्हणाल्या की, आमचे सरकार भाड्याच्या घरांमध्ये किंवा झोपडपट्ट्यांमध्ये किंवा चाळींमधील अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या पात्र लोकांना स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी मदत करेल. त्यासाठी ‘सर्वांसाठी घरे’ ही विशेष योजना सुरू करण्यात येणार आहे.

    Budget 2024 Governments big gift to the middle class scheme launched for those living in rented houses

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    DGMO Rajiv Ghai : भारताचे DGMO राजीव घई कोण आहेत?:गेल्या वर्षीच जबाबदारी मिळाली, 33 वर्षे सैन्यात सेवा केली

    Karnataka : कर्नाटक काँग्रेसने जम्मू-काश्मीरला पाकिस्तानचा भाग दाखवले; नंतर सोशल मीडिया पोस्ट काढून टाकली

    मोदींची आदमपूर हवाई तळाला भेट; बहादूर जवानांविषयी व्यक्त केली कृतज्ञता!!