• Download App
    नोकरदार मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा; टॅक्स स्लॅबमध्ये बदल, 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त Budget 2023 New Income Tax: Big relief for working middle class taxpayers; Changes in tax slabs, income upto 7 lakhs tax free

    Budget 2023 New Income Tax : नोकरदार मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा; टॅक्स स्लॅबमध्ये बदल, 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 – 24 चा अर्थसंकल्प मांडताना अपेक्षेनुसार मध्यमवर्गीयांना नवीन कर प्रस्ताव सादर करून दिलासा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी नवीन कर प्रस्तावांमध्ये नोकरदार आणि मध्यमवर्गीयांना दिलासा दिल्याचे बोलले जात आहे. करपात्र उत्पन्नाची मर्यादा 7 लाख इतकी करण्यात आली आहे. मात्र, हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे.  Budget 2023 New Income Tax: Big relief for working middle class taxpayers; Changes in tax slabs, income upto 7 lakhs tax free

    – नवीन कर उत्पन्न मर्यादा

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात टॅक्स स्लॅबबाबत घोषणा केली. आता, सात लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे. हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे.

    उत्पन्न प्राप्तिकर : 0 ते तीन लाख 0 % 3 ते 6 लाख 5 %, 6 ते 9 लाख 10 %, 9 ते 12 लाख 15 %, 12 ते 15 लाख 20 %, 15 लाख हून अधिक 30 %

    प्राप्तिकर सवलत मर्यादा 2.50 लाखांवरून 5 लाख करण्याची आवश्यकता आर्थिक तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मागील काही वर्षांपासून टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल झाला नव्हता. सरकारकडून टॅक्सबेस वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे प्राप्तिकर रिटर्न दाखल करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सरकारने टॅक्स स्लॅब वाढवला तर करदाते वाचणाऱ्या पैशातून खरेदीकडे, गुंतवणुकीकडे वळतील. याचा फायदा अर्थव्यवस्थेला होणार असल्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला होता.

    सध्या ज्यांचे वार्षिक करपात्र उत्पन्न 2.5 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यांना या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही. ज्यांचे उत्पन्न 2.50 ते 5 लाख रुपये आहे, त्यांना 5 टक्के दराने म्हणजेच 12500 रुपये कर भरावा लागतो.

    प्राप्तिकराच्या नियम 87A अंतर्गत, सरकार 12,500 रुपयांची कर सवलत देते. करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही.

    ज्यांचे करपात्र उत्पन्न 5 लाखांपेक्षाही अधिक आहे, त्यांना या सवलतीचा लाभ मिळत नाही. अशा लोकांना केवळ महागाई, आरबीआयच्या रेपो रेटमध्ये वाढ झाल्यानंतर वाढलेला ईएमआय आदीमुळे खिशावर अधिकच ताण येतो.

    Budget 2023 New Income Tax : ज्येष्ठ नागरिकांना दिलासा

    ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) अंतर्गत, ज्येष्ठ नागरिक सध्या कमाल 15 लाख रुपये जमा करू शकतात. ही मर्यादा 30 लाख रुपये करण्यात येणार आहे.

    – महिलांसाठी बचत योजना

    महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा, दोन वर्षांसाठी गुंतवणूक करता येणार आहे. दोन लाखापर्यंतची रक्कम ठेवता येईल. 7.5 % व्याजदर मिळणार आहे.

    Budget 2023 New Income Tax: Big relief for working middle class taxpayers; Changes in tax slabs, income upto 7 lakhs tax free

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!