विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा दहावा आणि आणि स्वतःचा तिसरा अर्थसंकल्प सादर केला. सुमारे एक तास ३२ मिनिटे चाललेल्या या अर्थसंकल्पात अनेक क्षेत्रांचा वेध आहे. पण जर तुम्ही घाईत असाल तर केवळ एकाच मिनिटात तुम्हाला येथे त्याची माहिती मिळू शकते… Budget 2022: Understand the budget in just one minute
• प्राप्तिकरात बदल नाही
• याच वर्षापासून डिजिटल करन्सी
• सर्व दीड लाख टपाल कार्यालयात याच वर्षापासून कोर बँकिंग
• ई पासपोर्ट सुरू होणार
• 5G सेवा याच वर्षी
• 60 लाख नव्या नोकऱ्यांची निर्मिती
• तीन वर्षात नवीन 400 वंदे भारत रेल्वे धावणार
• राज्यांना 1 लाख कोटींचे विशेष सहाय्य
• 25 हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग, 80 लाख घरे आणि 2 कोटी घरांना नळाने पाणी
• 2 लाख अंगणवाड्यांचा दर्जा वाढ