विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : “सबका साथ सबका विकास” ही केंद्रातल्या मोदी सरकारची परवलीची घोषणा आहे. मात्र 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला सबका प्रयासचीही जोड दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 – 23 चा अर्थसंकल्प मांडताना यातल्याच “सबका प्रयास”वर भर दिला आहे. दोन वर्षांच्या कोरोना काळाच्या संकटातून देशाच्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी याच सबका प्रयास परवलीच्या घोषणेचा उपयोग होईल, असे स्पष्ट केले. केंद्रीय अर्थसंकल्पात विविध नव्या घोषणा करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा भर सबका प्रयास या मुद्याभोवती केंद्रित राहिला आहे. Budget 2022 – 23: Next 25 years of rapid economic growth; Union Finance Minister’s emphasis on “Sabka Prayas” !!
कोरोनाच्या संकटात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडला. 1 फेब्रुवारीला हा अर्थसंकल्प लोकसभेत पटलावर ठेवण्यात आला. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाचा हा अर्थसंकल्प पूर्णपणे डिजिटल आहे. अर्थसंकल्पाच्या मोजक्याच प्रती छापण्यात आल्या.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या काही घोषणा पुढीलप्रमाणे
- ९.०२ टक्के देशाचा विकासदर असेल. कोरोनाच्या महामारीतही अर्थव्यवस्था सुरळीत ठेवल्याचा हा परिणाम आहे.
- देश आझादीचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. पुढील २५ वर्षे वेगवान आर्थिक प्रगतीची असतील.
- मायक्रो इकॉनॉमी वाढवणे, डिजिटल टेक्नॉलॉजी वाढवणे हे आपले ध्येय आहे.
- घर, गॅस, पाणी गरिबांना देत आहोत, त्यांच्या खात्यात थेट रक्कम देत आहोत
- वर्षभरात २५ हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बांधले
- २०२२-२३ – ४ लॉजिस्टिक पार्क उभारणार
- २०२२-२३ ४ लॉजिस्टिक पार्क उभारणार
- ४०० वंदे भारत ट्रेन ३ वर्षांत बांधणार
- पीएम गतीशक्ती योजनेद्वारे एक्स्प्रेस हायवे विकसित करण्याचे ध्येय
- या योजनेसाठी 25 हजार कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित
- वाहतूक आणि दळवळण वेगवान होणार
- यामुळं प्रवासाचा वेळ कमी होणार
- इंधनाचा खर्च कमी वाचणार
- एलआयसीचा आयपीओ लवकरच येणार
- गती शक्ती योजनेद्वारे पायाभूत सोयी सुविधांचा विकास
- सबका साथ सबका विकास आणि सबका कल्याण हे सरकारचे धोरण. यालाच सबका प्रयासची जोड देण्यात आली आहे.
- 30 लाख नोकऱ्या निर्माण करण्यासाठी प्रयत्न
- बँकाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहोत
- मेट्रो मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी उभारणार
- पर्वत माला – खडतर भागात रस्ते बांधले जाणार, त्यातून पर्यटनाला प्रोत्साहन त्यासाठी ८ रोप वे बांधणार
- किसान ड्रोन ला प्रोत्साहन देणार
- कृषी विद्यापीठांसाठी राज्यांना प्रोत्साहन देणार नाबार्डमधून त्यांना साहाय्य करू
- ६२ लाख लोकांना पाणी पुरवणार
- २२ लाख मेगा वॉट सोलर एनर्जी निर्माण
- ५ नद्या जोडणार
- २०० टी व्ही चॅनल निर्माण कारणार १ ली ते १२ वी पर्यंत शिक्षण देणार सर्व प्रादेशिक भाषेत शिकवणार
- डिजिटल युनिव्हर्सिटी निर्माण करणार, नेटवर्क हब मॉडेल म्हणून त्या ओळखल्या जातील
- वन स्टेशन वन प्रोडक्ट योजना आणणार
- छोट्या शहरात काम करणाऱ्या उद्योजकांना याचा लाभ होणार आहे
- पुढच्या तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरु होणार
- रेल्वेचं जाळं विकसित करणार
- मेट्रोच्या विकासासाठी प्रयत्न करणार
- मेट्रोचं जाळं प्राधान्यानं विकसित करणार
- 2022-2023 मध्ये आठ ठिकाणी रोप वे सुरु करणार
- रस्ते विकासासाठी पीपीपी मॉडेल वापरणार
- १.५ लाख टपाल कार्यालये डिजिटल होणार बँकिंग सिस्टीम एकमेकांना जोडणार
Budget 2022 – 23: Next 25 years of rapid economic growth; Union Finance Minister’s emphasis on “Sabka Prayas” !!
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : ओबीसी आरक्षणावर मध्य प्रदेश सरकारचा मोठा निर्णय, थेट भरतीत 27% जागा मिळणार; नवीन पद्धत लागू
- अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात तेजीचे वातावरण, सेन्सेक्सची ८५० आणि निफ्टीची २०० हून अधिक अंकांची उसळी
- अॅपवर अर्थसंकल्प थेट पाहता येणार
- LPG Cylinder : बजेटपूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरामध्ये ९१.५० रुपयांनी घट
- गोव्यात नऊ पक्षांत लढत; भाजपचे सर्वाधिक ४० उमेदवार; लढतीचे चित्र अधिक स्पष्ट