• Download App
    अर्थसंकल्प 2022 - 23 : ठोस तरतुदींमधून आत्मनिर्भर भारताची पायाभरणी; पंतप्रधान मोदींनी सोप्या भाषेत समजावला अर्थ!!। Budget 2022 - 23: Laying the foundation of a self-reliant India through concrete provisions; Prime Minister Modi explained the meaning in simple language !!

    अर्थसंकल्प 2022 – 23 : ठोस तरतुदींमधून आत्मनिर्भर भारताची पायाभरणी; पंतप्रधान मोदींनी सोप्या भाषेत समजावला अर्थ!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सोप्या भाषेत अर्थ समजावून सांगितला. भाजप कार्यकर्त्यांना ते संबोधित करत होते. आकडेवारीच्या जंजाळात न अडकता देशातल्या गरिबातल्या गरीब व्यक्तीपर्यंत अर्थसंकल्पातून कोणते फायदे आणि लाभ दिले आहेत याचे विवेचन पंतप्रधानांनी केले. Budget 2022 – 23: Laying the foundation of a self-reliant India through concrete provisions; Prime Minister Modi explained the meaning in simple language !!

    केंद्रीय अर्थसंकल्प फक्त देशातल्या 5 – 6 बड्या उद्योगपतींच्या सांगण्यावरून मांडला आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशात 3 कोटी लोक लखपती झाले आहेत, याकडे कार्यकर्त्यांचे आवर्जून लक्ष वेधले आहे.

    आर्थिक सुधारणांचे लाभ सुरुवातीच्या दशकात समाजाच्या वरच्या दोन स्तरांपर्यंत पोहोचले. पण बाकीचे स्तर वंचित राहिले. परंतु, आता आर्थिक सुधारणांचे लाभ आता समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्याची कामगिरी सरकारने केली आहे आणि अर्थसंकल्पात याविषयीच्या ठोस तरतुदी आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

    पंतप्रधान मोदी म्हणाले :

    •  देश १०० वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीशी लढत आहे. करोनाच्या या काळात जगासमोर अनेक आव्हाने आली आहेत. आपण पुढे जे जग पाहणार आहोत ते करोनापूर्वीचे जग राहणार नाही.
    •  करोनानंतर नव्या जागतिक व्यवस्थेची चिन्हेही दिसू लागली आहेत. आज भारताकडे पाहण्याच्या जगाच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. आता जगभरातील लोकांना भारताला अधिक मजबूत रूपात पहायचे आहे, जेव्हा संपूर्ण जग भारताकडे नव्याने पाहत आहे, तेव्हा आपणही देशाला अधिक वेगाने पुढे नेणे आवश्यक आहे.
    • नवीन संधी आणि नवीन संकल्प पूर्ण करण्याची ही वेळ आहे. भारत स्वावलंबी झाला पाहिजे आणि आत्मनिर्भर भारताच्या पायावर आधुनिक भारताची उभारणी झाली पाहिजे. शेती पासून संरक्षण क्षेत्रापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर भारतासाठी ठोस आर्थिक तरतुदी करण्यात आले आहेत.
    • 2013 – 14 मध्ये भारताची निर्यात 2 लाख 85 हजार कोटी रुपयांची होती. आज भारताची निर्यात 4 लाख 70 हजार कोटींच्या आसपास पोहोचली आहे.”
    •  9 कोटी ग्रामीण घरांमध्ये नळांचे पाणी पोहोचू लागले आहे. यापैकी गेल्या दोन वर्षांत जलजीवन अभियानांतर्गत 5 कोटींहून अधिक नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. यावर्षी सुमारे 4 कोटी ग्रामीण कुटुंबांना नळजोडणी देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
    •  गेल्या 7 वर्षात आपल्या सरकारने 3 कोटी गरीबांना पक्की घरे देऊन लखपती बनवले आहे. जे गरीब होते ते झोपडपट्टीत राहत होते, आता त्यांच्याकडे स्वतःचे घर आहे. या घरांसाठीची रक्कमही पूर्वीच्या तुलनेत वाढली असून मुलांना अभ्यासासाठी जागा मिळावी म्हणून घरांचा आकारही वाढला आहे. यातील बहुतांश घरे महिलांच्या नावावर आहेत.

    Budget 2022 – 23: Laying the foundation of a self-reliant India through concrete provisions; Prime Minister Modi explained the meaning in simple language !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य