विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांचे खासदार रितेश पांडे यांनी बहुजन समाज पार्टी सोडून भाजपमध्ये आज प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेले या प्रवेशामुळे बहुजन समाज पार्टीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. BSP MP Ritesh Pandey joins BJP in the presence of Uttar Pradesh Deputy CM Brajesh Pathak and other BJP leaders.
रितेश पांडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या अखेरच्या अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी जेवायला बोलावले होते म्हणून त्यांनी मोदींना “पटून” भाजप प्रवेश केल्याच्या पुड्या मायावतींच्या गोटातून सोडण्यात आल्या, पण केवळ मोदींच्या एका जेवणातून “पटले” जाऊन नितेश पांडे यांनी बहुजन समाज पार्टी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे का?? किंबहुना एवढा त्यांचा भाजप प्रवेश उथळ राजकीय घडामोड आहे का??, हा कळीचा सवाल आहे.
रितेश पांडे हे उत्तर प्रदेशातल्या आंबेडकर नगरचे खासदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत मायावतींनी राज्यातून जे 10 खासदार निवडून आणले होते, त्यापैकी ते एक ब्राह्मण खासदार आहेत. मायावतींच्या “सोशल इंजिनिअरिंग”मध्ये त्यावेळी ते “फिट” बसल्याने त्यांना मायावतीने उमेदवारी दिली आणि त्यांनी मोदी लाटेत देखील मायावतींच्या बहुजन समाज पार्टीला आंबेडकर नगर मधून विजय मिळवून दिला होता.
पण त्यानंतरच्या गेल्या 5 वर्षांमध्ये रितेश पांडे यांचे बहुजन समाज पार्टीचे महत्त्व टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आले. खासदार म्हणून त्यांची कामगिरी समाधानकारक राहिली, पण बहुजन समाज पार्टीतल्या पक्षांतर्गत निर्णयांमध्ये रितेश पांडे यांचे स्थान टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आले आणि इथेच रितेश पांडे यांचे मायावतींची बिनसले. आपल्या राजीनामा पत्रात रितेश पांडे यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये स्वतः संदर्भात घडलेल्या सर्व घटना घडामोडींचा सविस्तर उल्लेख केला आहे. बहुजन समाज पार्टी का सोडावी लागत आहे, याचे तपशीलवार वर्णन त्यांनी राजीनामा पत्रात केले आहे.
पण मायावतींनी ते पत्र जसेच्या तसे स्वीकारून काही सकारात्मक कार्यवाही करण्यापेक्षा रितेश पांडे यांच्या पत्राच्या निमित्ताने मायावतीने बहुजन समाज पार्टीच्या बाकीच्याच खासदारांना इशारा दिला आहे. तुम्ही तुमच्या मतदारसंघात काम करता का??, बहुजन समाज पार्टीने दिलेल्या आदेशानुसार तुम्ही पक्ष शिस्त पाळता का?? तुमच्या मतदार संघात बहुजन समाज पार्टीचे तत्त्वज्ञान तुम्ही अंमलात आणता का??, वगैरे सवालांच्या तोफा त्यांनी आपल्याच खासदारांवर डागल्या आहेत. रितेश पांडे पक्ष सोडताना बाकीच्या खासदारांना संभाळण्याच्या ऐवजी मायावतींनी त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
अर्थातच मायावतींच्या या “सुप्रीमो” म्हणजेच वर्चस्ववादी वर्तणुकीला कंटाळूनच रितेश पांडे यांनी बहुजन समाज पार्टी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केवळ मोदींच्या एका जेवणामुळे “पटून” त्यांनी बहुजन समाज पार्टी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, असे म्हणणे ही मायावतींच्या पक्षासाठी आत्मवंचना आहे आणि तसे विश्लेषण करणे हा माध्यमांचा उथळपणा आहे!!
BSP MP Ritesh Pandey joins BJP in the presence of Uttar Pradesh Deputy CM Brajesh Pathak and other BJP leaders.
महत्वाच्या बातम्या
- नाट्यसंस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी राज्यात ७५ नाट्यगृहे अद्ययावत करण्यात येणार – मुख्यमंत्री शिंदे
- हल्दवानी हिंसाचाराचा मास्टरमाइंड अब्दुल मलिकला दिल्लीतून अटक
- 40 वर्षांनंतर पवारांना आत्ता रायगड आठवला!!; फडणवीस + राज ठाकरेंचा निशाणा
- अखिलेश यादव राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत सामील होणार, पण तिला PDA यात्रा म्हणणार!!