वृत्तसंस्था
बेंगळुरू : दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होताच बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. येडियुरप्पा यांनी भाजपा सरकारच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा निर्णय जाहीर केला. Bs Yediyurappa Resigns As Karnataka Chief Minister
येडियुरप्पा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ सोमवारी पूर्ण झाला त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे. कर्नाटकमध्ये खांदेपालट होण्याचे संकेत अनेक दिवसांपासून वर्तवण्यात आले होते. अखेर आज येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले आहेत.
पक्षश्रेष्ठींचे निर्देश मिळाल्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. पक्षश्रेष्ठींचे निर्देश आले की तुम्हालाही त्याबाबत कळेलच, असे येडियुरप्पा यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. आपण केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य करू याचा पुनरुच्चार त्यांनी केला होता. आपण समाधानी असून पक्षाची शिस्त मोडणार नाही, असेही ते म्हणाले होते.
येडियुरप्पा आज दुपारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील. येडियुरप्पा यांनी भाजपा सरकारच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा निर्णय जाहीर केला. दुपारी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांना आपण राजीनामापत्र देणार असल्याचे येडियुरप्पा यांनी सांगितले.
बेंगळुरू येथील कर्नाटक विधान सौधा येथे येडियुरप्पा सरकारच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमाच्या वेळी भाषणादरम्यान भावूक झाले होते. ज्यावेळी कोणतीही गाडी नव्हती तेव्हा शिमोगा, शिकारीपुरा येथे काहीच कार्यकर्ते नसताना पक्ष उभा करण्यासाठी आम्ही सायकल चालवत जात असल्याची आठवण त्यांनी सांगितलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात केंद्रात पुन्हा भाजपा सत्तेवर यावी ही माझी इच्छा आहे.” असे येडियुरप्पा म्हणाले.
येडियुरप्पा यांनी चांगले काम केले आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटले आहे. मात्र, केंद्रीय संसदीय कामकाज आणि खनिकर्ममंत्री प्रल्हाद जोशी, त्याचबरोबर कर्नाटकचे मंत्री मुरुगेश निरानी यांना भाजपाश्रेष्ठींनी तातडीने दिल्लीला पाचारण केले होते. त्यामुळे आता कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी कोण असणार याबाबत दिल्लीत चर्चा सुरु असल्याचे म्हटले होते.
Bs Yediyurappa Resigns As Karnataka Chief Minister
महत्त्वाच्या बातम्या
- Mann ki Baat : राष्ट्रगीतावर अनोखे अभियान ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापर्यंत, जाणून मोदींच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
- Pegasus Issue : पेगासस वादावरून माकप खासदाराची सुप्रीम कोर्टात धाव, SIT चौकशीसाठी याचिका दाखल
- Raj Kundra Pornography Case : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या संयुक्त खात्यात परदेशातून पैसे; आता ईडी करणार मनी लॉन्ड्रिंगची चौकशी
- गल्लत गोल्ड मेडलची : प्रिया मलिकने वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण, लोकांना वाटले ऑलिम्पिक गोल्ड