वृत्तसंस्था
तेहरान : हिजाब विरोधी आंदोलकांपुढे इराणचे कट्टरतावादी सरकार झुकल्याच्या बातम्या मध्यंतरी प्रसार माध्यमांमध्ये आल्या होत्या. पण ती वस्तुस्थिती नसून त्यापेक्षा इराणी सरकार आणि लष्कराचा भयानक चेहरा समोर आला आहे. Brutal brutality of army against women against hijab
इराण मधले हिजाब विरोधी महिलांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी इराणी लष्कराने महिलांवर क्रूर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळेच या आंदोलनात मृतांची संख्या वाढली, याला पुष्टी मिळत आहे. माणुसकीला लाजवेल, असे क्रूर कृत्य इराणच्या लष्कराने इराणच्या महिलांशी केले आहे. कालपर्यंत ही माहिती लपवण्यात आली होती, परंतु डॉक्टर आणि परिचारिकांमुळे हा अन्याय उजेडात आला आहे.
महिलांच्या गुप्तांगांना लक्ष्य
इराणमधील अनेक डॉक्टर आणि परिचारिका हिजाबविरोधी आंदोलनात जखमी झालेल्या लोकांवर उपचार करत आहेत. अटक टाळण्यासाठी हे डॉक्टर आणि परिचारिका जखमी आंदोलनकर्त्या महिलांवर छुपे उपचार करत आहेत. जखमींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, इराणचे सैन्य महिलांच्या गुप्तांगांना लक्ष्य करत आहेत. उपचारासाठी येणाऱ्या महिलांच्या पाय, नितंब, पाठ, स्तन आणि गुप्तांगावर जखमा झाल्या आहेत. इराणी लष्कराचे सुरक्षा अधिकारी पुरुष आणि महिलांना वेगवेगळ्या प्रकारे टार्गेट करत आहेत. विशेष म्हणजे इराणी सैन्याला महिलांचे सौंदर्य नष्ट करायचे असल्याचा कट दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
10-10 लष्करांनी घेरुन एक-एका महिलेला केले लक्ष्य
एका 20 वर्षांच्या महिलेवर उपचार करण्यात आले, त्या महिलेच्या गुप्तांगात दोन गोळ्या, तर मांडीच्या आतील भागात दहा गोळ्या लागल्याचे दिसले. या 10 गोळ्या सहज निघाल्या, पण दोन छर्रे महिलेच्या गुप्तांगात अडकल्या, असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. या महिलेला 10 लष्कराच्या जवानांनी घेरले. त्यानंतर तिच्या मांड्यांमध्ये छर्रे मारले. इराणच्या कट्टरवादी सरकारच्या क्रूरतेचे काही फोटोही समोर आले आहेत. या फोटोंमध्ये महिलांच्या अंगावर गोळ्यांचा वर्षाव केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हे छर्रे अगदी जवळून मारलेले दिसत आहेत. इराणमध्ये या वर्षी १३ सप्टेंबरला महसा अमिनी नावाच्या इराणी महिलेला हिजाब न घातल्यामुळे अटक करण्यात आली होती.
त्यानंतर 16 सप्टेंबर रोजी पोलिस कोठडीत त्याचा मृत्यू झाला. महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये गृहयुद्धाची स्थिती आहे. तिथे हिजाबविरोधी आंदोलने वारंवार होत आहेत. इराणच्या जवळपास प्रत्येक शहरात महिला हिजाब कायद्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. आपल्या हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. इराणच्या सर्व 31 प्रांतांतील 164 शहरांमध्ये ही निदर्शने सुरू आहेत. इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनांमुळे आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. निदर्शने पाहून घाबरलेले इब्राहिम रायसी सरकार दडपशाहीवर झुकले आहे. कट्टर इस्लामिक विचारसरणीच्या सरकारने तेथील इंटरनेट सेवाही बंद केली. त्यामुळेच फार कमी माहिती बाहेर येत आहे.
Brutal brutality of army against women against hijab
महत्वाच्या बातम्या