British PM Boris Johnson : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द केला आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांनी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जॉन्सन यांचा भारत दौरा रविवारी सुरू होणार होता. British PM Boris Johnson’s visit to India canceled
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द केला आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांनी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जॉन्सन यांचा भारत दौरा रविवारी सुरू होणार होता.
यापूर्वी ब्रिटिश पीएम बोरिस जॉन्सन हे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होणार होते. तथापि, तेव्हा ब्रिटनमध्ये तेव्हा कोरोनाचा संसर्ग शिखरावर होता. यामुळे तेव्हाही त्यांनी आपला भारत दौरा रद्द केला. आता पुन्हा एकदा कोरोनामुळे त्यांना आपला भारत दौरा रद्द करावा लागला आहे. त्याऐवजी या महिन्याच्या अखेरीस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोरिस जॉन्सन दोन्ही देशांमधील संबंधांवर आणि भविष्यातील योजनांवर चर्चा करतील. याशिवाय ते सतत संपर्कात आहेत. आगामी काळात दोन्ही पंतप्रधानांची भेट होण्याची शक्यता आहे. बोरिस जॉन्सन यांचा दौरा रद्द होण्याबाबत दोन्ही देशांकडून संयुक्त निवेदन जारी केले जाऊ शकते. बोरिस जॉन्सन यांच्या भारत भेटीवरून ब्रिटनच्या विरोधी पक्षानेही टीका केली होती. विरोधी पक्षांनी म्हटले होते की, ब्रिटनमधील कोरोना संकटादरम्यान पंतप्रधानांनी परदेशात जाणे टाळले पाहिजे.
पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई) च्या मते, गत महिन्यापासून ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या ‘डबल म्युटंट’ भारतीय स्वरूपाच्या 77 केसेसची नोंद झाली आहेत. एवढेच नव्हे, तर भारतात कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
British PM Boris Johnson visit to India canceled
महत्त्वाच्या बातम्या
- Important Websites : आपल्या शहरात हॉस्पिटल बेड शोधायला अडचण येतेय? मग या वेबसाइट जरूर पाहा
- WATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग
- बंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन!
- Delhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…
- Israel : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध? देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक