• Download App
    ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांना किस पडला महागात, टीकेनंतर दिला राजीनामा। British minister resigned due to kiss

    ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांना किस पडला महागात, टीकेनंतर दिला राजीनामा

    विशेष प्रतिनिधी

    लंडन : कोरोना नियम लागू असतानाही सार्वजनिक ठिकाणी आपल्या जवळच्या महिला सहकाऱ्याचे चुंबन घेतल्याबद्दल टीकेचे धनी बनलेले ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. British minister resigned due to kiss

    हॅनकॉक यांनी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना पत्र लिहित राजीनामा देत असल्याचे सांगितले. ‘या संसर्गाच्या काळात जनतेने फार मोठा त्याग केला असताना त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,’ असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. हॅनकॉक यांनी सामाजिक अंतराच्या नियमाचा भंग केल्याने जनतेमधून उघडपणे नाराजी व्यक्त होत होती.



    महिला सहकाऱ्याचे चुंबन घेत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले होते. हा व्हिडिओही सोशल मीडियामधून सर्वत्र पसरला होता, शिवाय एका वृत्तपत्रानेही याबाबतचे छायाचित्र प्रसिद्ध करत टीका केली होती. त्यामुळे राजीनाम्यासाठी त्यांच्यावर दबाव येत होता. या पार्श्वभूमीवर हॅनकॉक यांनी आज एक व्हिडिओही प्रसिद्ध करत राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. हॅनकॉक यांच्या नियमभंगाबरोबरच त्यांच्या विवाहबाह्य संबंधांबाबतही चर्चा होत आहे.

    या किसमुळे त्यांच्यावर टीका होत होती. त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत होती. माजी महापौर साजिद जावेद हे आता या पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.

    British minister resigned due to kiss

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र