• Download App
    Britain supplies thousands of missiles to Ukraine: More than 4,000 anti-tank weapons were seized

    ब्रिटनकडून युक्रेनला हजारो क्षेपणास्त्रांचा पुरवठा: ४ हजारांहून अधिक रणगाडाविरोधी शस्त्रे धाडली

    वृत्तसंस्था

    लंडन : ब्रिटनने युक्रेनला हजारो क्षेपणास्त्रांचा पुरवठा केला असून ४ हजारांहून अधिक रणगाडाविरोधी शस्त्रे धाडली आहेत. Britain supplies thousands of missiles to Ukraine: More than 4,000 anti-tank weapons were seized

    युक्रेनला लष्करी सामग्रीचा पुरवठा वाढवावा, असे आवाहन ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केले असून, स्वत: ब्रिटन युक्रेनला आणखी हजारो क्षेपणास्त्रे पाठवणार आहे.



    ‘नाटो’ आणि जी-७ च्या नेत्यांशी बोलणी करण्यासाठी जॉन्सन ब्रसेल्सला जात आहेत. ब्रिटनकडून दिल्या जाणाऱ्या नव्या मदतीचे आणखी तपशील देण्याची अपेक्षा आहे. यात रणगाडाविरोधी आणि अत्यंत स्फोटक शस्त्रांचा समावेश असलेल्या आणखी ६ हजार क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. ‘युक्रेनला लष्करी व आर्थिक मदतीत वाढ करण्यासाठी, तसेच त्यांची संरक्षण फळी बळकट करण्यासाठी ब्रिटन आपल्या मित्रांसह प्रयत्न करेल’, असे जॉन्सन म्हणाले. ब्रिटनने यापूर्वीच ४ हजारांहून अधिक रणगाडाविरोधी शस्त्रे युक्रेनला पाठवली आहेत.

    Britain supplies thousands of missiles to Ukraine: More than 4,000 anti-tank weapons were seized

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Navjot Kaur Sidhu : नवजोत सिद्धू यांच्या पत्नीने नवीन पक्ष स्थापन केला; घोषणा करताना पती सोबत नव्हते

    अमेरिका – इराण युद्धात म्हणे, मोदी “टेलिफोन ऑपरेटर”; तर मग जे. डी. व्हान्स आणि वांग यी कोण??

    Sabarimala : सुप्रीम कोर्टात केंद्राने म्हटले- शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय चुकीचा