पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी राजीनामा दिला आहे. दुपारी 4.30 वाजता राज्यपालांना भेटल्यानंतर त्यांनी राजीनामा सोपवला. तत्पूर्वी, विविध माध्यमांमध्ये त्यांच्या राजीनाम्याचे अंदाज वर्तवले होते. आता पंजाबचा नवा मुख्यमंत्री कोण होणार यावरून विविध तर्कवितर्क लढवले जात असून या शर्यतीत जाखड, सिद्धू व अंबिका सोनी यांची नावे आहेत. Breaking News Punjab CM Captain Amarinder Singh Resign
विशेष प्रतिनिधी
चंदिगड : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी राजीनामा दिला आहे. दुपारी 4.30 वाजता राज्यपालांना भेटल्यानंतर त्यांनी राजीनामा सोपवला. तत्पूर्वी, विविध माध्यमांमध्ये त्यांच्या राजीनाम्याचे अंदाज वर्तवले होते. आता पंजाबचा नवा मुख्यमंत्री कोण होणार यावरून विविध तर्कवितर्क लढवले जात असून या शर्यतीत जाखड, सिद्धू व अंबिका सोनी यांची नावे आहेत.
पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचला आहे. 40 आमदारांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याविरोधात आघाडी उघडल्यानंतर पक्षाने शनिवारी विधिमंडळ गटाची बैठक बोलावली. ही बैठक संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. तत्पूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
राजीनाम्यानंतर काय म्हणाले अमरिंदर सिंग?
राज्यपालांना राजीनामा सुपूर्द केल्यानंतर अमरिंदर सिंग माध्यमांना समोरे गेले. ते म्हणाले की, ज्या प्रकारे चर्चा झाली त्यावरून अपमानित वाटत आहे. मी आज सकाळी काँग्रेस अध्यक्षांशी बोललो, त्यांना सांगितले की मी आज राजीनामा देणार आहे. अलिकडच्या महिन्यांत आमदारांना भेटण्याची ही तिसरी वेळ आहे. म्हणूनच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मी काँग्रेस पक्षात आहे, माझ्या समर्थकांशी सल्लामसलत केल्यानंतर भविष्याबाबत निर्णय घेईन, असेही ते म्हणाले. कॅप्टन पुढे म्हणाले की, पक्षाध्यक्षांना ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांना त्यांनी पंजाबचा मुख्यमंत्री निवडावे.
राजीनाम्यापूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधींना संवाद साधला आणि त्यांना विश्वासात न घेता कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावल्याबद्दल एआयसीसीवर आक्षेप नोंदवला होता. त्यांच्या मते, जर ते अशाच प्रकारे पक्षात साइडलाइन राहिले तर मुख्यमंत्री म्हणून कायम राहण्यास असमर्थ आहेत.
दुसरीकडे, सिद्धू गटातून कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची चर्चा होती. नाराज आमदार विधिमंडळ गटाचे नेते म्हणून नवज्योतसिंग सिद्धू किंवा सुनील जाखड यांचे नाव पुढे करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधिमंडळ गटाच्या बैठकीत कोण-कोण येणार?
पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहतील. यात दोन केंद्रीय निरीक्षक अजय माकन आणि हरीश चौधरीदेखील उपस्थित राहतील. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनीही ट्विट करून म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाच्या सूचनेनुसार विधिमंडळ पक्षाची बैठक 18 सप्टेंबरला म्हणजेच आज बोलावण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या प्रेस सेक्रेटरीचे सूचक ट्विट
कॅप्टन अमरिंदर सिंग हे मुख्यमंत्रिपदाचा आणि काँग्रेसचा राजीनामा देणार असल्याच्या बातम्यांच्या दरम्यान त्यांचे प्रेस सचिव विमल सुंबाली यांनी ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, “जर कोणी तुम्हाला फसवून तुम्हाला चकित करत असेल, तर तुम्हाला योग्य उत्तर देऊन त्यांना धक्का देण्याचा अधिकार आहे.”
अमरिंदर सिंग यांना काँग्रेस हायकमांडचा इशारा
बैठकीपूर्वीची मोठी घडामोड म्हणजे काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यास सांगितले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांच्यासह हायकमांडने नियुक्त केलेले दोन निरीक्षकही आजच्या बैठकीला उपस्थित राहतील.
अमरिंदर यांना बाजूला सारल्याने अँटी इन्कम्बन्सी संपेल?
अनेक आमदारांना वाटते की, कॅप्टन सरकार 2017 मध्ये जनतेला दिलेली शेकडो आश्वासने पूर्ण करू शकली नाही, त्यामुळे लोक संतापले आहेत आणि काँग्रेसची स्थिती हलाखीची आहे. पण प्रश्न असा आहे की, निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला लावून अँटी इन्कम्बन्सी संपेल का?
अमरिंदर यांचे नेतृत्व बहुतेकांना अमान्य
गेल्या आठवड्यात मंत्र्यांशी सल्लामसलत केल्यानंतर अनेक आमदारांनी हायकमांडला विधिमंडळ गटाची बैठक बोलावण्यासाठी पत्र लिहिण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. आमदार सुरजीत धिमन यांनी तर असे म्हटले की, जर काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर यांच्या नेतृत्वाखाली 2022 ची निवडणूक लढवली, तर ते निवडणूक लढणार नाहीत.
Breaking News Punjab CM Captain Amarinder Singh Resign
महत्त्वाच्या बातम्या
- खुशखबर : खाद्य तेलांच्या किमतीत घसरण, जाणून घ्या कोणते तेल किती झाले स्वस्त?
- फौजदारी खटल्यांची चुकीची माहिती देणे महागात पडणार, सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका, अशा कर्मचाऱ्यांना नियुक्तीचा हक्क नाही
- मोठी बातमी : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासोबतच काँग्रेस पक्षाचाही राजीनामा देऊ शकतात कॅप्टन अमरिंदर; पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप
- Kabul Drone Attack : पेंटागॉनने चूक कबूल केली, माफी मागत म्हटले, दहशतवाद्यांऐवजी 10 अफगाण नागरिकांचा जीव गेला
- मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी, रेल्वेत गॅस अटॅक आणि प्रवाशांवर हल्ला करू शकतात अतिरेकी