• Download App
    1 मेपासून देशात 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण, केंद्र सरकारकडून मोठी घोषणा । Breaking News everyone above the age 18 eligible to get vaccine from May 1st

    मोठी बातमी : १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण, केंद्र सरकारकडून मोठी घोषणा

    everyone above the age 18 eligible to get vaccine : कोरोना महामारीच्या मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणास मुभा देण्यात येणार आहे. यामुळे देशातील लसीकरणाला मोठा वेग येणार आहे. Breaking News everyone above the age 18 eligible to get vaccine from May 1st


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना महामारीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण (Corona Vaccine For Above age 18 from 1st May) खुले करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशातील तज्ज्ञ डॉक्टरांसोबतच्या बैठकीनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पीएम मोदी म्हणाले की, गेल्या एका वर्षापासून सरकार शक्य तितक्या लोकांना लस डोस देण्याचा प्रयत्न करत आहे.

    आता लसीकरणाचा तिसरा टप्पा

    पहिल्या टप्प्यात, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीकरणास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस देण्यात येत आहे. आता 1 मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार असून 18 वर्षांवरील प्रत्येकाला लसीकरणास केंद्र सरकारने मुभा दिली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे कोरोनाविरुद्ध लढाईत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    केंद्र सरकारने म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेच्या तिसर्‍या टप्प्यात लसींची खरेदी आणि लसीकरणासाठी पात्रता शिथिल केली जात आहे. निवेदनात म्हटले आहे की, लस उत्पादकांना उत्पादन वाढविण्यासाठी आणखी प्रोत्साहन दिले जात आहे.

    त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज प्रख्यात डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत सांगितले की, कोरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे सर्वात मोठे शस्त्र आहे. अधिकाधिक लोकांना लसी देण्यासाठी प्रोत्साहित करण्यास त्यांनी डॉक्टरांना सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, महत्त्वाची बाब म्हणजे लसीबद्दल लोकांनी कोणतीही भीती बाळगू नये.

    देशात 92 दिवसांत 12 कोटींहून जास्त लसीकरण

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात 92 दिवसांत लसीचे 12 कोटींहून जास्त डोस देण्यात आले आहेत. मंत्रालयाने सांगितले की, एकूण 12,26,22,590 डोस देण्यात आलेले आहेत. लाभार्थींमध्ये लसीचा पहिला डोस देण्यात आलेल्या
    91,28,146 आरोग्य कर्मचार्‍यांचा समावेश आहे. तर 57,08,223 आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आलेला आहे.

    परदेशातील लसींही लवकरच भारतात येणार

    भारतात सध्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाची कोव्हिशील्ड लोकांना देण्यात येत आहेत. याचबरोबर सरकारने नुकतेच रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीलाही मान्यता दिली आहे. आगामी काळात इतर देशांतील लसीही लवकरच देशात उपलब्ध होणार आहेत. अमेरिका, इंग्लंड, जपान तसेच जागतिक आरोग्य संघटनेने मंजूर केलेल्या लसींना देशात चाचणीविना वापरण्यास मुभा देण्याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच म्हटले होते.

    आजच्या निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे

    • प्राधान्य गटांना पूर्वीप्रमाणेच विनामूल्य लस देणे सुरू राहील.
    • तिसर्‍या टप्प्यात लसींच्या खरेदीसाठीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत.
    • राज्यांना थेट लस उत्पादकांकडून अतिरिक्त लस घेण्याचा अधिकार असेल.
    • राज्ये आता 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना लसीकरण सुरू करू शकतात किंवा वर्गवारीही करू शकतात.
    • लस उत्पादकांना उत्पादन वाढविण्यासाठी सरकारतर्फे प्रोत्साहित करण्यात येईल.

    लस मोफत की विकत?

    कोरोनाविरुद्धची लस 18 वर्षांपुढील सर्वांना उपलब्ध होणार आहे. याबाबत सरकारकडून नुकतीच घोषणा झाली आहे. लवकरच याच्या प्रोटोकॉलविषयी माहिती दिली जाईल. लसीसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील किंवा नाही, याबाबतही सरकार लवकरच माहिती स्पष्ट करणार आहे. अलीकडच्या काळात अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोना लसीची निर्धारित वयोमर्यादा कमी करावी अशी मागणी केली होती. अशा परिस्थितीत सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आतापर्यंत केवळ 45 वर्षांच्या वर असलेल्यांनाच लसीचा डोस देण्यात येत होता, परंतु आता 18 वर्षांवरील वयोगटातील प्रत्येकाला 1 मेपासून लस देण्यात येणार आहे. लोकांना त्यांचे आधार कार्ड लसीकरण केंद्रावर आणावे लागेल, त्यानंतर त्यांना लसीचा डोस मिळू शकेल.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!