coal scam case : कोळसा घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना समन्स जारी केले आहेत. बॅनर्जी यांना 3 सप्टेंबर रोजी एजन्सीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. ईडीने त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांनाही समन्सही जारी केले असून त्यांना 1 सप्टेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे. Breaking News ED summons TMC leader Abhishek Banerjee and his wife in coal scam case
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोळसा घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना समन्स जारी केले आहेत. बॅनर्जी यांना 3 सप्टेंबर रोजी एजन्सीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. ईडीने त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांनाही समन्सही जारी केले असून त्यांना 1 सप्टेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे.
यापूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाने कोळसा घोटाळ्याप्रकरणी तृणमूल नेते विनय मिश्रा यांच्या भावाला अटक केली आहे. विनय मिश्रा हे ममतांचे पुतणे अभिषेक बॅनर्जींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. विनय मिश्रा यांचे भाऊ विकास मिश्रा यांना ईडीने कोळसा घोटाळा आणि गाय तस्करी प्रकरणात अटक केली होती.
विनय मिश्राविरुद्ध ओपन वॉरंट मिळाल्यानंतर सीबीआयनेही रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. त्यांच्यावर कोळसा आणि गाय तस्करीत गुंतल्याचा आरोप आहे. विनय मिश्रा तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यासाठी दुवा म्हणून काम करत असत. या प्रकरणात सीबीआयने यापूर्वी अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी आणि त्यांच्या नातेवाइकांची चौकशी केलेली आहे.
या तस्करी प्रकरणाची तार यूथ तृणमूल कॉंग्रेसचे सरचिटणीस विनय मिश्रा यांच्यापर्यंत पोहोचली. पशू तस्करी आणि अवैध कोळसा खाण प्रकरणात 31 डिसेंबर 2020 रोजी कोलकाता येथे विनय मिश्राविरोधात शोध मोहीमही राबविण्यात आली. विनय मिश्राविरोधात तपास यंत्रणेने लूक आऊट परिपत्रक जारी केले होते. परंतु परिपत्रकाच्या सूचनेनंतर विनय मिश्रा फरार झाला होता.
Breaking News ED summons TMC leader Abhishek Banerjee and his wife in coal scam case
महत्त्वाच्या बातम्या
- अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून दाखवू, परिणामाची चर्चा कधी करत नाही, नाशकात संजय राऊतांचा राणेंवर निशाणा
- झटपट श्रीमंत बनण्याच्या नादात तरुणांचे कृत्य, 78 एसी चोरून भाजीपाल्यासारखे रस्त्यावर विकले, पाच जणांना अटक
- BH Series Registration Mark : वाहनांना मिळणार नवीन BH रजिस्ट्रेशन मार्क, ट्रान्सफरची प्रोसेसची होणार खूप सोपी
- KBC 13 First Crorepati : सीझनची पहिली ‘करोडपती’ ठरली हिमानी बुंदेला, यशासाठी 10 वर्षे केले प्रयत्न
- नवज्योत सिंग सिद्धू यांच्या आक्रमक भाषणापुढे काँग्रेस हायकमांड हतबल; हरीश रावत म्हणाले “ते” काही बंडखोर नाहीत!!