• Download App
    तिरुमला येथे उद्यापासून आठवडाभर ब्रह्मोत्सव सुरु|Bramostav will began from tomorrow

    तिरुमला येथे उद्यापासून आठवडाभर ब्रह्मोत्सव सुरु

    विशेष प्रतिनिधी

    तिरुमला – तिरुमला येथे येत्या ७ ते १५ ऑक्टोबरदरम्यान वार्षिक ब्रह्मोत्सव होत आहे. मंगळवारी पारंपरिकरीत्या मंदिराची स्वच्छता करण्यात आली. येत्या गुरुवारपासून तिरुमला येथे ब्रह्मोत्सवास प्रारंभ होत आहे.Bramostav will began from tomorrow

    दरवर्षी या महोत्सवासाठी जगभरातून लाखो भाविक तिरुपतीला भेट देतात. त्यानिमित्ताने मुख्य मंदिराचा गाभारा, परिसराची स्वच्छता करण्यात आली. तिरुमला मंदिराची वर्षातून चारवेळेस स्वच्छता केली जाते आणि ही स्वच्छता उगादी, अनिवारा अस्थानम, वार्षिक ब्रह्मोत्सव आणि वैंकुठ एकादशीच्या अगोदर केली जाते.



    परिमलम नावाच्या वनौषधी असलेल्या मिश्रणाची फवारणी मुख्य मंदिराबरोबरच देवस्थान परिसरातील मंदिराचे छत, भिंत आणि खांबावर करण्यात आली. यावेळी मुख्य मंदिरातील मुख्य मूर्ती झाकली होती. मंदिराची साफसफाई आणि पूजेच्या भांडी स्वच्छ झाल्यानंतर मूर्तीवरील आच्छादन काढण्यात आले.

    Bramostav will began from tomorrow

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lok Sabha : लोकसभेत निवडणूक सुधारणांवर चर्चा, मतचोरीवर वादंग; राहुल गांधींना दुबेंचे उत्तर- पदांचे बक्षीस तर काँग्रेस देत होती

    गुजरातेत 6 वर्षांच्या चिमुरडीवर निर्भयासारखे क्रौर्य; बलात्कारात अपयशी ठरल्याने गुप्तांगात रॉड घातला, आरोपीला अटक

    India Russia : भारतीय वस्तू 40 ऐवजी 24 दिवसांत रशियात पोहोचतील; मोदी-पुतिन यांच्या करारामुळे 6000 किमीची बचत