वृत्तसंस्था
लंडन : गेल्या ३० वर्षांत जगातील कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत उच्च रक्तदाबाने त्रस्त असलेल्या व्यक्तींची संख्या वाढत आहे, असे ‘लॅन्सेट’ या नियतकालिकातील आकडेवारीवरून उघड झाले आहे. BP patients increasing very fastly in world
जगभरात दरवर्षी लाखो लोक उच्च रक्तदाबामुळे मृत्युमुखी पडतात. हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे व मूत्रपिंडांच्या आजारालाही उच्च रक्तदाब कारणीभूत आहे. रक्तदाब नियंत्रित केल्याने पक्षाघाताचा धोका ३५ ते ४० टक्क्यांनी व तर हृदयविकाराचा धोका २० ते २५ टक्क्यांनी घटू शकतो.
आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाने गेल्या ३० वर्षांतील १८४ देशांतील ३० ते ७९ या वयोगटातील दहा कोटी व्यक्तींच्या रक्तदाबाचे नमुने तपासले. यावेळी, रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, रक्तदाबाचे निदान सहजसोपे असताना आणि त्यावरील औषधे स्वस्त असतानाही २०१९ म्हणजे जवळपास निम्म्या रुग्णांना आपल्याला उच्च रक्तदाब असल्याची जाणीवच नव्हती.
सध्या पॅराग्वे, तुवालू या देशांत निम्म्याहून अधिक महिला उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत. अर्जेंटिना, पॅराग्वे, ताजिकिस्तान आदी देशांत निम्म्याहून अधिक पुरुषांचा उच्च रक्तदाब आहे. कॅनडा व पेरू या देशांत उच्च रक्तदाबाचे रुग्ण सर्वांत कमी आहेत.
BP patients increasing very fastly in world
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, तमिळनाडू, राजस्थानातील शाळा सुरु, विद्यार्थ्यांत उत्साह – पालकांत धास्ती
- टोमॅटो, हिरव्या मिरचीच्या पाठोपाठ ढोबळीही रस्त्यावर ; शेतकऱ्याला घाऊक बाजारात मिळाला किलोला दोन रुपये भाव
- काश्मीरी फुटीरतावादी नेते सय्यद अहमद शाह गिलानी निधनानंतर पाकिस्तानने झेंडा अर्ध्यावर उतरविला; इम्रान खान यांचे आक्षेपार्ह ट्विट
- मास्क विरोधी रॅली काढणाऱ्या अमेरिकन नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू; टेक्सासमध्ये काढली होती रॅली