नाशिक : राहुल गांधी आणि शरद पवारांच्या सकट लिबरल लोकांनी Gen Z च्या पोरांवर ठेवला भरवसा; पण त्या पोरांनी JNU मध्ये फडकवला संघाचा झेंडा!!, असला प्रकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या निमित्ताने घडलेला समोर आला. RSS flag in JNU
– राहुल + पवारांची चिथावणी
नेपाळ आणि बांगलादेशात तिथल्या Gen Z तरुणांनी घडवून आणलेल्या सत्तांतरामुळे राहुल गांधी आणि भारतातल्या लोकांचे चांगलेच फावले. किंबहुना त्यांच्या आशा आणि आकांक्षा फारच पल्लवीत झाल्या. आपण कितीही आदळ आपट करून मोदींना हरवू शकत नाही, तर निदान त्यांना कुठल्यातरी कारणाने का होईना, सत्तेच्या खुर्चीवरून बाजूला तर करता येऊ शकेल, त्यासाठी भारतातल्या Gen Z ची मदत घेऊ, असा चंग राहुल गांधी, शरद पवार आणि बाकीच्या लिबरल लोकांनी बांधला. राहुल गांधींनी आणि शरद पवारांनी तर नेपाळ आणि बांगलादेश मधल्या Gen Z च्या पोरांची “प्रेरणा” घेऊन भारतातल्या Gen Z च्या पोरांनी केंद्रातले मोदी सरकार आणि राज्यांमधली भाजप सरकारे उलथवून टाकावीत, अशी चिथावणी सुद्धा देऊन झाली. याची चिथावणीला समाजवादी पार्टी, तृणमूळ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम, राष्ट्रीय जनता दल या पक्षांनी खत पाणी घालून झाले.
– भारतातली Gen Z नाही बधली
पण भारतातली Gen Z काही बधायला तयार झालेली दिसली नाही. उलट भारतातल्या पोरांनी छोट्या-मोठ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचा पराभव केला. यामध्ये दिल्ली विद्यापीठाचा सुद्धा समावेश होता. शिवाय
बांगलादेश आणि नेपाळ मध्ये उठलेली आणि उलटलेली Gen Z ची पोरे तिथल्या घराणेशाहीच्या नेत्यांवरच चढली. तिथल्या घराणेशाहीच्या नेत्यांची सत्ता तिथल्या Gen Z ने उलथवून टाकली. तशी भारतातली Gen Z ची पोरं उठली तर भारतातलीच घराणेशाही ते नष्ट करायला कमी करणार नाहीत, हे राहुल गांधी, शरद पवार आणि बाकीच्या लिबरल लोकांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे ते भारतातल्या Gen Z च्या पोरांना चिथावणी देतच राहिले.
– संघाचा झेंडा आणि संचलन
तरीही राहुल गांधी आणि बाकीच्या लिबरल लोकांच्या चिथावणीला भारतातली Gen Z बधली नाही किंवा त्यांच्या चिथावणीने भडकली सुद्धा नाही. त्या उलट कम्युनिस्ट, डावे, काँग्रेसी, लिबरल, वगैरे लेबले मोठ्या अभिमानाने मिरवणाऱ्या आणि काँग्रेसने प्रचंड फंडिंग करून वाढविलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) तिथल्या Gen Z तरुणांनी एकत्र येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) झेंडा फडकवला. पण ते नुसते संघाचा झेंडा फडकवून थांबले नाहीत, तर तिथे त्यांनी संघाची प्रार्थना म्हटली. त्यानंतर सगळ्यांनी संघाच्या गणवेशात आणि घोषवादानात संघाच्या शताब्दीचे संचलन काढले. विद्यापीठ जवाहरलाल नेहरूंच्या नावाचे आणि तिथे लाठी चालविली संघाने असला प्रकार घडला. पण हे होत असताना राहुल गांधी दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर निघून गेले आणि बाकीचे लिबरल लोक नेहमीप्रमाणे हात चोळत बसले.
Boys hoisted the RSS flag in JNU
महत्वाच्या बातम्या
- Prime Minister Modi : मैदानावरही ऑपरेशन सिंदूर, निकाल तोच – भारत विजयी, पंतप्रधान मोदींनी केले भारतीय संघाचे कौतुक
- Owaisi Rally : बिहारमध्ये ओवैसींच्या रॅलीत ‘आय लव्ह मोहम्मद’चे पोस्टर्स; म्हणाले – आपल्या हक्कांसाठी राजकीय नेतृत्व मजबूत करावे लागेल
- BJP Retaliates : मातोश्रीचे खिसे झटका, किमान 20 हजार कोटी शेतकऱ्यांना द्या; भाजपचा ठाकरे गटावर पलटवार
- रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची गोदाकुटी महापुरात गेली वाहून; गोदावरी महाआरतीची उज्ज्वल परंपरा मात्र कायम!!