विशेष प्रतिनिधी
लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन (वय ५६) यांनी मैत्रीण केरी सायमंड्स वय (३३) यांच्याबरोबर एका खासगी छोटेखानी समारंभात विवाह केला. रोमन कॅथोलिक वेस्टमिंस्टर कॅथेड्रलमध्ये निवडक मित्रपरिवार आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांनी विवाह केला. Boris Jhonsan get married third time
जॉन्सन आणि केरी यांचे प्रेमसंबंध असल्याचे २०१९ मध्ये उघड झाले होते आणि त्यांनी २०२० मध्ये साखरपुडाही केला होता. केरी या २०१० पासून हुजूर पक्षाच्या कार्यालयात काम करत होत्या. जॉन्सन हे महापौरपदासाठी लढत असताना त्यांच्यासाठीही त्यांनी काम केले होते. जॉन्सन यांच्या द्वीतीय पत्नी मरिना व्हीलर यांनी २०१८ मध्ये त्यांच्यापासून घटस्फोट घेतला.
विजय मल्याला लंडनच्या न्यायालयाचा दणका, दिवाळखोरीची याचिका फेटाळून लावली
जॉन्सन यांचा याआधी दोन वेळेस विवाह झालेला आहे. केरी या पर्यावरणवादी असून जॉन्सन आणि त्यांना एक वर्षाचा मुलगाही आहे. जॉन्सन यांना आधीच्या विवाहांमधून आणखी पाच अपत्येही आहेत. केरी यांचा मात्र हा पहिलाच विवाह आहे. पदावर असताना विवाह केलेले जॉन्सन हे ब्रिटनचे गेल्या दोनशे वर्षांमधील पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. त्याआधी रॉबर्ट बँक्स जेन्किन्सन यांनी १८२२ मध्ये पंतप्रधान पदावर असताना विवाह केला होता.
Boris Jhonsan get married third time
महत्त्वाच्या बातम्या
- राणीच्या बागेत आता गुंजणार चित्ता तसेच पांढऱ्या सिंहांची डरकाळी
- स्वच्छ भारत मिशन ! ‘ग्रँड वॉटर सेव्हिंग चॅलेंज’- केंद्र सरकार देत आहे ५ लाख रुपये जिंकण्याची संधी ; २५ जून पूर्वी करा अर्ज
- सोशल मीडियाच्या स्वयंघोषित फॅक्ट चेकर्सवर रविशंकर प्रसादांचा तिखट प्रहार; मोदी व्देषाच्या कारस्थानाची पोलखोल
- पवारांचे राजकारण ४० वर्षे ओळखत असल्याचे सांगत प्रकाश आंबेडकरांची खासदार संभाजीराजेंबरोबर जाण्याची तयारी