• Download App
    पवित्र अमरनाथ गुहेपाशी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या गाड्या पोहोचल्या; मेहबूबा - अब्दुल्लांच्या पोटात दुखले!!|Border Road Organization trains reached the holy Amarnath cave; Mehbooba - Abdullah's stomach hurts!!

    पवित्र अमरनाथ गुहेपाशी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या गाड्या पोहोचल्या; मेहबूबा – अब्दुल्लांच्या पोटात दुखले!!

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर : पवित्र अमरनाथ गुहेपाशी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या गाड्या पोहोचल्या आणि जम्मू काश्मीर मधील राजकीय पक्ष प्रोग्रेसिव डेमोक्रॅटिक पार्टी आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्या नेत्यांच्या पोटात दुखले!!Border Road Organization trains reached the holy Amarnath cave; Mehbooba – Abdullah’s stomach hurts!!

    पवित्र अमरनाथ गुहेपाशी जाण्यासाठी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने जुने रस्ते दुरुस्त केले. काही रस्त्यांचे चौपदरीकरण केले. आता अमरनाथ यात्रेकरूंना संगम बेस कॅम्प पासून गाड्यांमधून थेट अमरनाथ गुहेपाशी जाता येणार आहे. यात्रेकरूंना घोडेस्वारी अथवा पायपीट करण्याची गरज उरणार नाही. अमरनाथ यात्रा अधिक सोपी होईल आणि यात्रेकरूंच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. वयस्कर, वृद्ध, दिव्यांग यांना देखील सुरक्षितपणे वाहनांमधून अमरनाथ यात्रा करता येऊ शकेल.



    मात्र, अमरनाथ यात्रेकरूंना या सगळ्या सुख सोयी उपलब्ध होत असताना जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्ष पोटदुखी त्रस्त झाले आहेत. अमरनाथ गुहेपर्यंत गाड्या जाणार, यात्रेकरूंची अर्थात हिंदूंची संख्या वाढणार म्हणून माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्लांनी पर्यावरणाच्या मुद्द्याचे खुसपट काढून अमरनाथ गुहेपर्यंत रस्ते बनवण्याला आणि गाड्या नेण्याला विरोध केला आहे.

    अमरनाथ गुहे भोवतीचे पर्यावरण रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. यात्रेला जाण्यासाठी जे कष्ट होतात, ते कष्ट सर्व भाविकांना हवे असतात कारण त्याशिवाय त्यांची खरी यात्रा पूर्ण होणार नसते. हज यात्रेमध्ये देखील पायी चालण्यालाच महत्त्व आहे. तसे अमरनाथ आणि वैष्णोदेवी या यात्रेत अनेक भाविक पायी चालणेच पसंत करतात. ते पिठ्ठूवर किंवा घोड्यांवर सुद्धा बसायला नकार देतात. असे असताना भाविकांच्या भावना दुखवून अमरनाथ गुहेपर्यंत गाड्या नेण्याची सोय करण्याचे कारणच काय??, असा सवाल ओमर अब्दुल्लांनी केला.

    पर्यावरणामुळे दल लेख परिसरात नवीन बांधकाम करता येत नाही. दल लेक मध्ये जे लोक राहतात, त्यांना घरांची दुरुस्ती करता येत नाही. सोनमर्ग, गुलमर्ग इथे देखील पर्यावरणाचेच मुद्दे लोकांच्या प्रगतीच्या आड येतात, मग अमरनाथ गुहेत पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले हे आपल्याला महत्त्वाचे वाटत नाही का??, असा सवाल ओमर अब्दुल्लांनी केला.

     पण मुळात पोटदुखी कशासाठी??

    पण अमरनाथ गुहेपाशी गाड्या थेट पोहोचल्यामुळे यात्रेकरूंच्या संख्येत वाढ होईल. हिंदूंचे जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात आगमन वाढेल. त्यातून जम्मू काश्मीरचा इतर भारताच्या भागांशी कनेक्ट वाढेल ही भीती ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना वाटते. या दोन्ही नेत्यांची खरी पोटदुखी जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने हिंदूंची मोठी लोकसंख्या सतत प्रवास करत राहील. त्यातून या परिसराची ओळख “हिंदू” बनेल ही आहे. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांनी अमरनाथ गुहेपर्यंत रस्ते तयार करायला आणि वाहने न्यायला विरोध केला आहे.

    Border Road Organization trains reached the holy Amarnath cave; Mehbooba – Abdullah’s stomach hurts!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसेत वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी चौथी अटक; आरोपींनी मृताच्या घराची तोडफोड केली