विशेष गोष्ट म्हणजे बॉर्डर बटालियनमध्ये फक्त सीमा भागातील तरुण आणि महिलांनाच भरतीसाठी संधी देण्यात आली आहे.Border Battalion’s headquarters near the India-Pakistan border, 120 canals of land were allotted
विशेष प्रतिनिधी
जम्मू : जम्मू -काश्मीरच्या सीमावर्ती भागातील दहशतवाद्यांच्या तसेच पाकिस्तान लष्कराच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी एक बॉर्डर बटालियन स्थापन करत आहे. या बॉर्डर बटालियनचे मुख्यालय राजोरी जिल्ह्यातील सीमावर्ती गाव लंबडी येथे असेल.
मुख्यालयाच्या स्थापनेसाठी महसूल विभागाने 120 कॅनल्स जमीन गृह विभागाकडे हस्तांतरित केली आहे. राज्य सरकार दोन बॉर्डर बटालियन तयार करत आहे. एक बॉर्डर बटालियन जम्मू विभागात आणि दुसरी काश्मीरमध्ये स्थापन केली जाणार आहे.
महसूल विभागाच्या प्रधान सचिव शालीन काबरा यांनी राजोरी जिल्ह्यातील नौशेरा तहसीलच्या लंबडी गावातील खसरा क्रमांक 822 अंतर्गत 120 कॅनल जमीन गृह विभागाकडे हस्तांतरित केली आहे.
जम्मू विभागात स्थापन होत असलेल्या बॉर्डर बटालियनमध्ये 675 कॉन्स्टेबल आणि काश्मीरमध्ये स्थापन होत असलेल्या बॉर्डर बटालियनमध्ये 675 कॉन्स्टेबलच्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष गोष्ट म्हणजे बॉर्डर बटालियनमध्ये फक्त सीमा भागातील तरुण आणि महिलांनाच भरतीसाठी संधी देण्यात आली आहे.
Border Battalion’s headquarters near the India-Pakistan border, 120 canals of land were allotted
महत्त्वाच्या बातम्या
- कुंभमेळ्या दरम्यान बनावट कोरोना चाचण्यांप्रकरणी हरिद्वारमध्ये ईडीचे छापे, मनी लॉँडिंगचा गुन्हा दाखल
- आदिवासी असल्यानेच डॉ. भारती पवार यांना लोकसभेत बोलू दिले नाही, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचा विरोधकांवर हल्लाबोल
- मुस्लिमांविरुध्दच लव्ह-जिहाद, मुस्लिम-बिगर मुस्लिम विवाह शरीयतला मान्य नाहीत, ऑ ल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा फतवा
- दहशतवादाविरुध्द लढ्यातील शहीदांना जम्मू-काश्मीरमध्ये अनोखी श्रध्दांजली, शाळांना शहीदांचे नाव देऊन आठवण ठेवणार जागी