• Download App
    आरोग्य कर्मचाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिकांनाही घेता येणार बूस्टर डोस|Booster doses can be taken by senior citizens as well as health workers

    आरोग्य कर्मचाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिकांनाही घेता येणार बूस्टर डोस

    लसीकरण हे कोरोनो विरोधी लढाईतलं मोठं शस्त्र आहे.भारतानं आतापर्यंत १४१ कोटी डोस दिले आहेत.Booster doses can be taken by senior citizens as well as health workers


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच देशाला संबोधित केलं.यावेळी त्यांनी नागरिकांना सध्या सुरु असलेल्या नाताळ आणि वर्षअखेर या काळात कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आणि जास्तीत जास्त मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान यावेळी नरेंद्र मोदी यांनी आज तीन महत्वाच्या घोषणा देखील केल्या आहेत.



    तीन महत्वाच्या घोषणा

    १) ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोघटातील मुलाचं लसीकरण सुरु होणार.
    २) १० जानेवारी २०२२ पासून आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस दिला जाणार .
    ३) त्याचप्रमाणे १० जानेवारीपासून ६० वर्षांवरील नागरिकांनाही बूस्टर डोस दिला जाऊ शकतो, पण यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे.

    ओमायक्रानच्या पार्शव्भूमीवर काळजी घेणे गरजेचे आहे. नियमित मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच लसीकरण हे कोरोनो विरोधी लढाईतलं मोठं शस्त्र आहे.भारतानं आतापर्यंत १४१ कोटी डोस दिले आहेत. देशात लवकरच नाकाद्वारे देणारी लस आणि डीएनए लस देण्यात येणार आहे.

    Booster doses can be taken by senior citizens as well as health workers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Modi : ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल मोदींचा सन्मान; राजनाथ यांनी पुष्पहार घातला, हर हर महादेवच्या घोषणा

    DRDO : हेरगिरीच्या संशयावरून DRDO गेस्ट हाऊसच्या मॅनेजरला अटक; भारतातील सर्वोच्च संरक्षण तज्ज्ञ, शास्त्रज्ञ येथेच थांबतात

    Priyanka Gandhi : प्रियांका गांधींची सुप्रीम कोर्टाच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया, म्हणाल्या- खरा भारतीय कोण, हे जज ठरवणार नाहीत