धमकी मिळाल्यानंतर पोलिस सतर्क झाले असून, शोध मोहीम सुरू केली आहे. Bomb threat to Taj Hotel and Mumbai Airport
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पोलिसांना ताज हॉटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब स्फोट घडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. पोलिसांनी सोमवारी सांगितले की, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात ताज हॉटेल आणि शहरातील विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आल्याचा फोन आला होता. त्याचवेळी बॉम्बची धमकी मिळाल्याने पोलीस सतर्क झाले आहेत.
मुंबई पोलिसांनी सांगितले की, धमकीच्या कॉलवर तत्काळ कारवाई करण्यात आली आणि पोलिसांनी ठिकाणांचा शोध घेतला. मात्र, काहीही संशयास्पद आढळले नाही. हा धमकीचा फोन उत्तर प्रदेशातून आला असून कॉल करणाऱ्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या आधी दिल्ली आणि नंतर अहमदाबादच्या तीन शाळांना बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या आल्या होत्या. सोमवार, 6 मे रोजी शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी ईमेलद्वारे पाठवण्यात आली होती. अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी दिल्ली आणि एनसीआरमधील सुमारे 150 शाळांना बॉम्बची धमकी मिळाली होती, त्यानंतर प्रशासनाने तत्परता दाखवत शाळा रिकामी केल्या. विशेष तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Bomb threat to Taj Hotel and Mumbai Airport
महत्वाच्या बातम्या
- 6 राज्यांत उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट; उष्णतेमुळे राजस्थानमध्ये 2 दिवसांत 13 जणांचा मृत्यू
- 8 राज्यांतील 58 जागांवर 58.82% मतदान; बंगालमध्ये BJP उमेदवारावर हल्ला, पक्षाचा TMC वर आरोप
- चीनची तैवानला युद्धाची धमकी; म्हटले- जोपर्यंत तैवान आमचा भाग होत नाही, तोपर्यंत लष्करी कारवाई करत राहू
- राजकोटच्या गेम झोनमध्ये अग्नितांडव, तब्बल 24 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये 12 मुले; DNA टेस्टद्वारे पटवणार ओळख