- जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे
विशेष प्रतिनिधी
अलाहाबाद : अलाहाबाद विद्यापीठाच्या वसतिगृहात झालेल्या बॉम्बस्फोटात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी वसतिगृहात बॉम्ब बनवत असताना हा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच जखमी विद्यार्थ्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.Bomb making explosion in Allahabad University hostel students injured
हा विद्यार्थी बॉम्ब का बनवत होता, हे अद्याप पोलिस तपासात निष्पन्न झालेले नाही. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
या घटनेबाबत सहाय्यक पोलिस आयुक्त (शिवकुटी) राजेश कुमार यादव यांनी सांगितले की, अलाहाबाद विद्यापीठाचा एमएचा विद्यार्थी प्रभात यादव हा पीसी बॅनर्जी वसतिगृहातील खोलीत बॉम्ब बनवत होता. त्यानंतर बॉम्बचा स्फोट होऊन त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.
जखमी विद्यार्थ्याला एसआरएन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत आणखी एक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे.
Bomb making explosion in Allahabad University hostel students injured
महत्वाच्या बातम्या
- संसदेतले घुसखोर दाखवायला गेले बेरोजगारी; प्रत्यक्षात निघाले काँग्रेसी – डावे आंदोलनजीवी!!
- मध्य प्रदेशात “मोहन यादवी” कायदेशीर दंडा सुरू; मशिदींवरच्या लाऊड स्पीकरला चाप; खुल्यावर मांस विक्रीलाही बंदी!!
- धीरज साहू यांच्या घरात सापडलेल्या रोख रकमेनंतर आता घरातील सोन्याचा शोध घेण सुरू
- संसद घुसखोरीत अटक झालेली नीलम सामील होती फुटीरतावाद्यांच्या शेतकरी आंदोलनात; चौघांच्या कारस्थानाचा उलगडा!!