• Download App
    बंगालमध्ये भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या हत्येचा कट, घरावर बॉम्ब हल्ला, राज्यपाल धनखड यांचा कायदा व सुव्यवस्थेवर सवाल । Bomb Explosions Outside The Residence Of Member Of Parliament Arjun Singh This Morning Is Worrisome

    बंगालमध्ये भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या हत्येचा कट, घरावर बॉम्ब हल्ला; राज्यपाल धनखड यांचा कायदा व सुव्यवस्थेवर सवाल

    Member Of Parliament Arjun Singh : भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगालचे खासदार अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर बुधवारी सकाळी मोठा बॉम्बस्फोट झाला. राज्यपाल जगदीप धनखड यांनी ट्विट करून ही माहिती दिली. Bomb Explosions Outside The Residence Of Member Of Parliament Arjun Singh This Morning Is Worrisome


    वृत्तसंस्था

    कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगालचे खासदार अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर बुधवारी सकाळी मोठा बॉम्बस्फोट झाला. राज्यपाल जगदीप धनखड यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

    धनखड यांनी लिहिले की, पश्चिम बंगालमधील हिंसाचार थांबायचे नाव घेत नाहीये. आज सकाळी खासदारांच्या निवासस्थानाबाहेर झालेला बॉम्बस्फोट हा चिंतेचा विषय आहे आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित करतो. मला याप्रकरणी वेगवान कारवाईची अपेक्षा आहे. अर्जुन सिंह यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, हा मुद्दा यापूर्वीही उपस्थित केला गेला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा घरावर बॉम्ब हल्ला झाला तेव्हा खासदार आणि प्रदेश भाजप उपाध्यक्ष अर्जुन सिंह उपस्थित नव्हते. त्यांचे कुटुंबीय त्यावेळी घरी होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी केली, जेणेकरून बॉम्बरचा शोध घेता येईल.

    अर्जुन सिंह म्हणाले- मला मारण्याचा कट

    या प्रकरणावर अर्जुन सिंह यांचे वक्तव्यही समोर आले आहे. ते म्हणाले की, पोटनिवडणुकीपूर्वी मला मारण्याचा हा प्रयत्न आहे, कारण पक्षाने मला भवानीपूरचा प्रभारी बनवले आहे. ते म्हणाले की, बंगाल सरकारही या घटनेची चौकशी करेल आणि पूर्वीप्रमाणे या प्रकरणावर पडदा टाकेल. ते म्हणाले की, या प्रकरणात एफआयआर किंवा आरोपपत्र दाखल केले जाणार नाही.

    बंगालमधील दिग्गज नेते आहेत अर्जुन सिंह

    अर्जुन सिंह हे पश्चिम बंगालच्या बॅरकपूर लोकसभा मतदारसंघातून 17 व्या लोकसभेचे खासदार आहेत. त्यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक भाजपचे उमेदवार म्हणून लढवली आणि जिंकली. तत्पूर्वी, सिंग यांनी 2001 पासून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार म्हणून सलग चार वेळा भाटपारा विधानसभा जागा जिंकली होती. 1 जून 2020 रोजी त्यांची भाजपच्या पश्चिम बंगाल युनिटचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.

    Bomb Explosions Outside The Residence Of Member Of Parliament Arjun Singh This Morning Is Worrisome

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार

    Raihan Vadra Engagement : प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहानचा मैत्रीण अवीवा बेगसोबत साखरपुडा; दोघांनाही फोटोग्राफी-फुटबॉलची आवड

    मुंबईत ठाकरेच ठरले इतरांवर भारी; उमेदवारांच्या आकड्यांच्या हिशेबात मारली बाजी!!