• Download App
    बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टींने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, म्हटले... Bollywood actress Shilpa Shetty wrote a letter to Prime Minister Narendra Modi

    बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टींने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, म्हटले…

    जाणून घ्या, नेमकं कशाबद्दल पत्र पाठवलं आहे?

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : रामजन्मभूमी अयोध्येत २२ जानेवारी रोजी ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. केवळ देशाचे नव्हे तर अवघ्या जगभराचे लक्ष या सोहळ्याने वेधून घेतले होते. रामलल्लाची अतिशय सुंदर अशी मूर्ती अयोध्येत विराजमान झाली आहे. Bollywood actress Shilpa Shetty wrote a letter to Prime Minister Narendra Modi

    यामुळे राम मंदिर लढ्याला एकप्रकारे यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिलेला शब्द पूर्ण केला. त्यामुळे मोदींवरही कौतुकाच वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मोदींना एक विशेष पत्र पाठवून त्यांचे आभार व्यक्त केले आहे.

    भाजपने शिल्पा शेट्टीचे हे पत्र ट्वीट केले आहे आणि म्हटले की, सुप्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. पाच शतकांपासून श्रीरामांना वनवास घडत होता. अखेर तो वनवास संपला. तेही मोदीजींच्या प्रयत्नांमुळे. यासाठीच शिल्पा शेट्टींनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

    तर शिल्पा शेट्टींने म्हटले आहे की, ‘आदरणीय मोदीजी, काहीजण इतिहास वाचतात, काहीजण इतिहास शिकतात. परंतु तुमच्यासारखे लोक इतिहास बदलतात. तुम्ही राजन्मभूमीचा ५०० वर्षांचा इतिहास बदलून दाखवला आहे. तुम्हाला मनापासून धन्यवाद. या शुभ कार्यासह, प्रभु श्रीरामच्या नावाबरोबर सदैव तुमचे नाव जोडल्या गेले आहे. नमो राम…जय श्रीराम..’ आणि शेवटी शिल्पा शेट्टी कुंद्रा. असं लिहिले आहे.

    याचबरोबर या पार्श्वभूमीवर तुम्हीही पंतप्रधानांचे आभार मानणारे पत्र namo@bjpcc.org या ईमेल आयडीवर मेल करा, काही निवडक पत्रांना आम्ही मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिध्दी देऊ. असं आवाहन भाजपने केलं आहे.

    Bollywood actress Shilpa Shetty wrote a letter to Prime Minister Narendra Modi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!