वृत्तसंस्था
ढाका : बॉलिवूडची नटी नोरा फतेही हिला बांगलादेशात परफॉर्मन्स करायला मनाई करण्यात आली आहे… पण त्याचे कारण मात्र बांगलादेशच्या आर्थिक खस्ता हालतीचे देण्यात आले आहे. Bollywood actress Nora Fatehi banned in Bangladesh
बांगला देशाची आर्थिक वाटचाल श्रीलंकेच्या दिशेने सुरू आहे. परकीय चलन साठ्याने तळ गाठला आहे. त्यामुळे कोणालाही डॉलर्स मध्ये पैसा देण्यात बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर बंधने घातली आहे. या पार्श्वभूमीवर नोरा फतेही हिला बांगलादेशात परफॉर्मन्स करायला मनाई घातली आहे.
बांगलादेशातल्या एका संस्थेने वुमन लीडरशिप प्रोग्राम अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमात नोरा फतेही हिला डान्स परफॉर्मन्ससाठी बोलावले होते. पण तिचे मानधन डॉलर्स मध्ये असल्याने मर्यादेपलीकडे ते भरता येणार नाही म्हणून बांगलादेश सरकारनेच नोरा फतेही हिच्या कार्यक्रमावर बंदी घातली.
बांगलादेशात परकीय चलन साठ्याने तळ गाठला असून 12 ऑक्टोबर रोजी परकीय चलन साठा $36.33 अब्ज डॉलर्स एवढाच उरला आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये हाच परकीय चलन साठा $46.13 अब्ज डॉलर्स एवढा होता. आता बांगलादेशाच्या कडे असलेल्या परकीय चलन साठ्यातून केवळ 4 महिन्यांसाठी जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येतील. परकीय चलन साठ्याने तळ गाठल्यानंतर तिथल्या सरकारने डॉलर्स मधल्या व्यवहारावर मर्यादा आणल्या आहेत आणि त्यातूनच नवरा फतेह सारख्या बॉलिवूड नटीच्या कार्यक्रमाला मनाई केली आहे.
इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे शिष्टमंडळ पहिल्यांदा बांगलादेशाला भेट देणार आहे. बांगलादेशच्या परकीय चलन साठा सध्या समाधानकारक अवस्थेत आहे. परंतु तो वेगाने घटतो आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सरकारने कठोर आर्थिक बचतीच्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाच्या आशिया पॅसिफिक रीजनच्या डेप्युटी डायरेक्टर एने मेरी ग्लूड वुल्फ यांनी बांगलादेश सरकारला केल्या आहेत.
Bollywood actress Nora Fatehi banned in Bangladesh
महत्वाच्या बातम्या
- रशिया – युक्रेन युद्ध भडकण्याचा धोका; भारतीयांना लवकर युक्रेन सोडायचा सल्ला; दूतावासाची सूचना जारी
- PFI च्या गुप्त बैठका घेणाऱ्या म्होरक्यासह तिघांना एटीएस कडून पनवेलमध्ये बेड्या
- गांधी परिवाराच्या सहयोगातून, पण सावलीतून बाहेर पडून अध्यक्षपद सांभाळण्याचे मल्लिकार्जुन खर्गेंपुढे मोठे आव्हान
- दिवाळीत महागाईचा फटका : एसटीचे भाडे 10 % वाढले, पण खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांची तिप्पट भाडे वसुली
- फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात महाराष्ट्रासाठी रेल्वे विकासाचे हायस्पीड निर्णय; कोणते ते वाचा!