जाणून घ्या,नेमकं काय आहे प्रकरण?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते दलीप ताहिल यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. दलीप ताहिल यांना दोन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना पाच वर्षे जुन्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण 2018 मधील आहे. Bollywood actor Dalip Tahil was sentenced to prison
ताहिलवर 2018 मध्ये मुंबईच्या खार उपनगरी भागात दारूच्या नशेत एका ऑटोरिक्षाला त्यांच्या कारने धडक दिल्याचा आरोप आहे. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टरांच्या अहवालात अल्कोहोलचा वास आणि अभिनेता त्यावेळी नीट चालू शकत नसल्याच्या पुराव्यावर विश्वास ठेवून कोर्टाने हा निर्णय घेतला आहे. शिवाय, त्यांंना त्यावेळी नीट बोलताही येत नव्हते.
हे सर्व पुरावे लक्षात घेऊन न्यायदंडाधिकाऱ्यांनी दलीप ताहिल यांना दोषी ठरवून दोन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. पाच वर्षे जुन्या प्रकरणात दलीप ताहिलला मुंबईतून अटक करण्यात आली होती, मात्र नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षांपासून हे प्रकरण सातत्याने सुरू होते. आता याप्रकरणी निकाल देताना न्यायालयाने दलीपला दोन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.
Bollywood actor Dalip Tahil was sentenced to prison
महत्वाच्या बातम्या
- महुआ मोईत्रा वादापासून TMCने राखले अंतर; म्हटले- जो वादात अडकला, त्यानेच बोलावे; निशिकांत दुबे यांची लोकपालकडे तक्रार
- भारताचा मोस्ट वॉन्टेड लष्कर-ए-जब्बारचा संस्थापक दाऊद मलिक पाकिस्तानात ठार
- खासदार महुआ मोईत्रांच्या लाचखोरीतून प्रश्न घोटाळ्यातून तृणमूळ काँग्रेसने झटकले हात!!
- महुआ मोईत्राच्या अडचणी वाढण्याची चिन्हं! लोकसभा अध्यक्षांनंतर आता निशिकांत दुबे यांनी केली लोकपालकडे तक्रार