- सोशल मीडियावर झकास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे मानले आभार.
विशेष प्रतिनिधी
पुणे :भारतीय चित्रपट विश्वातलं आघाडीचे नाव. गेली 40 वर्ष भारतीय मनावर अधिराज्य गाजवणारा आणि आजही तितकाच चीरतरुण दिसणारा अभिनेता म्हणजे अनिल कपूर यांनी त्यांच्या चित्रपट कार्यकर्दीला आपल्या अतुलनीय कामगिरीने प्रेक्षकांना भुरळ घालत नुकतीचं 40 वर्ष पूर्ण केली आहेत. Bollywood actor Anil Kapoor completed 40 years industry
त्यानिमित्त त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जुन्या आठवणीत रमत “वो सात दिन ” या त्याच्या पहिल्यां सिनेमातील काही क्लिप शेअर केली आहेत. आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी कृतज्ञतापूर्वक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले आहेत.
आपल्या भावना व्यक्त करताना अनिल यांनी लिहिले ” आज मी एक अभिनेता आणि एक मनोरंजनकर्ता म्हणून 40 वर्षे पूर्ण करत आहे. 40 वर्षे तुम्हा प्रेक्षकांनी मला स्विकारला , प्रेम दिलं! मी जिथे आहे तेच मला करायचे आहे आणि हेच कायम करत राहायचं आहे ”
अनिल कपूर यांचा मोठा प्रवास हा अतुलनीय आहे.आणि अजूनही तो प्रवास अखंडीतपुणे चालू आहे. या त्यांच्या चित्रपट कारगिर्दित त्यांनी 100 हून अधिक चित्रपटातं कामं केलं आहे.
अनिल कपूरने त्यांचे दिवंगत गुरू बापू साब तसेच त्यांचे बंधू बोनी कपूर आणि त्यांचे वडील सुरिंदर कपूर यांनी त्यांच्या आयुष्यात बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दलही त्यांनी लिहिलं.
ज्यांनी त्यांच्या प्रतिभेवर विश्वास ठेवला आणि ‘वो सात दिन’मध्ये त्यांना पहिली संधी दिली. अभिनेत्याने दिग्गज नसीरुद्दीन शाह आणि मोहक पद्मिनी कोल्हापुरे यांचे मनापासून आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. अनिल यांच्यास्टारडम मागे असलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार अनिल यांनी मानले.
Bollywood actor Anil Kapoor completed 40 years industry
महत्वाच्या बातम्या
- खळबळजनक : ओवेसींच्या बुलडाणामधील सभेत औरंगजेबच्या समर्थनार्थ घोषणाबाजी!
- रशियातले बंड 12 तासांत थंड; पण बंडाची ठिणगी विझणार नसल्याचा युरोपियन माध्यमांचा दावा
- Monsoon Update : दिल्ली-एनसीआर आणि मुंबईत मान्सूनपूर्व यलो अलर्ट जारी
- विरोधकांचा जोर ऐक्यावर; पण मोदींचीच प्रतिमा घेतात डोक्यावर!