विशेष प्रतिनिधी
मुंबई – मुंबई महापालिका मुंबई सेंट्रल स्थानकाजवळील आग्रीपाडा येथे पहिले बेबी पार्क तयार करत आहे. कोविड काळात मोकळ्या जागांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे पालिकेने पहिले बेबी गार्डन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या बेबी गार्डनमध्ये लहान मुलांना बागडण्यासाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात येणार आहे. तसेच तरुण आणि ज्येष्ठांसाठी खुली व्यायामशाळा आहे.BMCC will start baby garden
बेबी गार्डनमधील दिवे, बाकेही आकर्षक पद्धतीने तयार करण्यात येणार आहेत. तसेच संरक्षक जाळ्याही त्याच पद्धतीने बनविण्यात येणार आहेत. स्वच्छतेच्या दृष्टीने कचऱ्याचे डबेही तयार करण्यात येणार आहेत.
लहान मुलांसाठी आकर्षित झाडेही लावण्यात येणार आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. यासाठी दोन कोटी ४९ लाखांचा खर्च अंदाजित आहे. महापालिकेकडून कार्यादेश मिळाल्यानंतर दीड वर्षामध्ये हे उद्यान तयार केले जाणार आहे. बालकांना दूध पाजण्यासाठी स्वतंत्र खोलीची सुविधाही असणार आहे,
तसेच उद्यानातील पदपथ ‘रफ कोटा अथवा जैसलमेर’ दगडांचा बनवण्यात येणार आहे. खुल्या व्यायामशाळेबरोबरच या उद्यानात योगा केंद्रही तयार करण्यात येणार आहे. हे संपूर्ण उद्यान बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांना वापरता येईल, अशा पद्धतीने तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या मुलांच्या खेळण्यासाठी जागा असेल, त्याचबरोबर स्वच्छतागृहदेखील असणार आहे.
BMCC will start baby garden
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई पोलीसांचे सीबीआय संचालकांना समन्स, फोन टॅपींग प्रकरणात होणार चौकशी
- कोरोना योद्धा : नर्सिंग शिक्षणाच्या ज्ञानाचा अचूक फायदा घेऊन एनीस जॉय यांनी केला कोडगु जिल्हा कोरोनामुक्त
- पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील इतर नेत्यांसाठी प्रेरणास्त्रोत्र, डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी केले कौतुक
- हे संस्कार आमच्या मुलावर नकोत ! बायजूसने थांबविल्या शाहरुख खानच्या जाहिराती