विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समिती ‘एक देश एक निवडणुकी’ वर विचार करत आहे. त्यांची ब्ल्यूप्रिंट तयार आहे. Blueprint for One Nation, One Election is ready, requires elections in 25 states by 2026
विधी आयोगाच्या या प्रस्तावाला सर्वपक्षीय सहमती मिळाल्यास 2029 पासून तो लागू होईल. पण, यासाठी डिसेंबर 2026 पर्यंत 25 राज्यांत निवडणुका घ्याव्या लागतील. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड व मिझोरामचा यात समावेश नाही. कारण येथील निवडणुकीचे निकाल याच महिन्यात आल्याने या विधानसभांचा कार्यकाळ 6 महिने वाढवला जाईल. नंतर सर्व राज्यांमध्ये विधानसभा व लोकसभा एकाच वेळी होतील. अनेक राज्यांमध्ये विधानसभेचा कार्यकाळ कमी केला जाणार आहे.
विधानसभा आणि लोकसभेसोबतच स्थानिक स्व. संस्था निवडणुका
सूत्रांच्या माहितीनुसार, कोविंद समिती विधी आयोगाकडून आणखी एक प्रस्ताव मागवेल, ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचाही समावेश करण्यास सांगितले जाईल. विधानसभेचा कार्यकाळ कमी करण्यासाठी संविधानाच्या १७२-१ चा वापर केला जाईल.
सरकार कोसळण्याच्या स्थितीत 4 पर्याय
१) राष्ट्रपती किंवा राज्यपाल उर्वरित कालावधीसाठी सर्वसहमतीचे सरकार स्थापनेचा मार्ग शोधतील.
२) उर्वरित कालावधीसाठी सर्व पक्षांना सामावून घेऊन अंतरिम सरकार स्थापन होईल. आमदारांच्या संख्येनुसार सर्व पक्षांचा वाटा असेल. या सरकारमधील सदस्य पंतप्रधान, मुख्यमंत्री निवडतील.
३) कलम 74-1 अंतर्गत काळजीवाहू सरकार स्थापन केले जाईल. या प्रकारचे सरकार 6 महिने टिकू शकते.
4) सरकार पडल्यास किंवा सभागृह विसर्जित झाल्यास निवडणुका होतील. मात्र, या निवडणुका उरलेल्या कालावधीसाठीच होतील.
2029 मध्ये लोकसभा-विधानसभा निवडणुका घेण्यासाठी विधानसभांचा कार्यकाळ आधी व नंतर घटवावा लागेल
Blueprint for One Nation, One Election is ready, requires elections in 25 states by 2026
महत्वाच्या बातम्या
- 24 जानेवारीला तज्ज्ञ वकिलांची फौज कोर्टात बाजू मांडणार, मराठा समाजाला न्याय मिळेल, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही
- DMK नेत्याची हिंदी भाषकांविरुद्ध गरळ; उत्तर प्रदेश, बिहार मधले लोक तामिळनाडूत येऊन टॉयलेट साफ करतात!!
- सगळेच प्रभारी बदलून काँग्रेसने टाकली “कात” की प्रियांकांना करून दिला “एस्केप रूट”??
- अखनूरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला; जवानांनी एका घुसखोर दहशतवाद्याला केलं ठारं, तिघांनी काढला पळ