कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्वरा यांनी ही माहिती दिली आहे.
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : लैंगिक शोषणाच्या आरोपात अडकलेले जेडीएसचे माजी नेते आणि कर्नाटकातील हसन लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या अडचणीत वाढ होत आहे. आता या प्रकरणी प्रज्वल रेवण्णाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्वरा यांनी ही माहिती दिली आहे.Blue corner notice issued against Prajwal Revanna, Interpol can help you
पीटीआय या वृत्तसंस्थेने कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्वरा यांच्या हवाल्याने सांगितले की, लैंगिक छळाच्या प्रकरणांचा सामना करत असलेल्या प्रज्वल रेवण्णाला भारतात परत आणण्यासाठी इंटरपोलची मदत घेतली जात आहे. याशिवाय केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ब्लू कॉर्नर नोटीसही जारी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाशी संबंधित व्हिडिओ समोर आल्यानंतरच हे स्पष्ट झाले. मात्र, कर्नाटक सरकारने या प्रकरणी एसआयटी स्थापन करून प्रज्वल रेवण्णा यांच्यावर कारवाई सुरू केली, मात्र त्यांना एसआयटी पकडू शकली नाही. लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे.
Blue corner notice issued against Prajwal Revanna, Interpol can help you
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसचे नेते पाहताहेत 2004 चे स्वप्न, पण त्यांना 1969 पाहायला नाही लागले म्हणजे मिळवलीन!!
- 4 जून नंतर काँग्रेसमध्ये पुन्हा पडणार फूट! प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा
- प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कॅण्डल : देवेगौडा पुत्र आणि प्रज्ज्वल पिता एचडी रेवण्णा पोलिसांच्या ताब्यात!!
- कांद्यावरची निर्यात बंदी उठवली तरी विरोधकांना पोटदुखीच; फडणवीसांचा निशाणा!!