वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात तुकडे तुकडे गॅंगने ब्राह्मण विरोधी रक्तपाताच्या घोषणा रंगवल्या आहेत. या प्रकाराचा विद्यापीठ प्रशासनाने तीव्र निषेध केला असून त्याची चौकशी देखील सुरू केली आहे. Bloody anti-Brahmin slogans staged at Delhi’s Jawaharlal Nehru University
जेएनयूमधील इंटरनॅशनल स्टडीज विभागाच्या इमारत क्रमांक दोनमध्ये विविध ब्राह्मण प्राध्यापकांच्या कार्यालयाच्या दरवाजावर रंगीत स्प्रेने या घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. नलिन कुमार मोहपात्रा, राज यादव, प्रवेश कुमार आणि वंदना मिश्रा या प्राध्यापकांच्या केबिनवर ‘शाखेत परत जा’ अशा घोषणा कलर स्प्रेने लिहिण्यात आल्या आहेत.
‘जेएनयू टीचर फोरम’ने या प्रकारानंतर ट्वीट करत डाव्या उदारमतवादी समुहावर प्रत्येक विरोधी आवाज दडपण्याचा आरोप केला आहे. तसेच विद्यापीठ परिसरात सर्वांना सारखीच वागणूक मिळावी, अशी मागणी केली आहे.
जेएनयूमधील ब्राह्मणविरोधी घोषणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ‘ब्राह्मण लाईव्ह मॅटर’ (Brahmins Lives Matter) हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. भाजपाशी संलग्न अखील भारतीय विद्यार्थी संघटनेने (एबीव्हीपी) या प्रकारासाठी डाव्या विद्यार्थी संघटनांवर आरोप केला आहे.
या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाने निवदेन जारी करत विद्यापीठ सर्वांसाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच शिक्षकांच्या केबिनवर लिहिण्यात आलेल्या या घोषणांचा निषेध करण्यात आला आहे.
या प्रकरणात एडवोकेट नवीन जिंदाल यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली असून पोलिसांनी दखल घेत या प्रकाराची चौकशी देखील सुरू केली आहे.
Bloody anti-Brahmin slogans staged at Delhi’s Jawaharlal Nehru University
महत्वाच्या बातम्या