विशेष प्रतिनिधी
काठमांडू : एव्हरेस्टवर मोहीम सुरू केली, तेव्हा मी भयभीत झालो होतो. कारण मी कोठे आणि कसा जात आहे, हे काहीच समजत नव्हते. सतत मी अडखळत होतो. अनेक ठिकाणी पडलो देखील. आपल्याला दृष्टी आहे की नाही, आपले हात-पाय आहेत की नाही यावरुन काहीच अडत नाही. जर आपली इच्छाशक्ती जबरदस्त असेल तर आपण हवे ते साध्य करू शकतो. जे की दुसरे साध्य करू शकत नाहीत. हे उद्गार आहेत चीनचे ४६ वर्षीय गिर्यारोहक झांग होंग यांचे. Blind Mousterian climbs evrest
आपल्या अफाट इच्छाशक्तीच्या जोरावरच होंग यांनी माउंट एव्हरेस्ट सर केले असून ते अंध आहेत. एव्हरेस्टरवर चढाई करणारे ते जगातील तिसरे तर आशियातील पहिले अंध गिर्यारोहक ठरले आहेत.
गेल्या २५ वर्षापासून त्यांना जग पाहता येत नव्हते. तरीही त्यांनी ८८४९ मीटर उंचीचे शिखर गाठले, हे विशेष. होंग यांनी दृष्टिहीन अमेरिकी गिर्यारोहक एरिक वेहेनमेयर यांच्यापासून प्रेरणा घेत माउंट एव्हरेस्ट वर चढाई करण्याचा निर्णय घेतला. वेहेनमेयर यांनी २००१ मध्ये माउंट एव्हरेस्टवर चढाई केली होती.
Blind Mousterian climbs evrest
महत्त्वाच्या बातम्या
- राहूल, प्रियंकाच्या लसीबाबतच्या भूमिकेवर कॉँग्रेस नेते शशी थरुर यांचेच प्रश्नचिन्ह, आता लस इतर देशांना का देत नाही असा सरकारला केला सवाल
- मोदींना घायाळ करणारी 6 वर्षांच्या ‘काश्मिरी कळी’ची गोड गळ
- बौद्ध विद्येतील योगदानाबद्दल पुण्यातल्या भांडारकर इन्स्टिट्यूटचा सन्मान संस्थेचा
- अहंकाराने केला जनसेवेचा पराभव, राज्यपाल धनखड यांची ममतांवर टीका
- सीबीएसईच्या बारावी परीक्षा रद्द : मोदींनी घेतला निर्णय उद्धव कधी घेणार?