Bleeding & clotting cases : भारतात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी देशव्यापी लसीकरण अभियान सुरू आहे. यादरम्यान लसीकरणानंतर रक्त गोठण्याच्या तक्रारी खूप कमी प्रमाणात आढळल्या आहेत. सोमवारी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय एईएफआय समितीच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. यानुसार आतापर्यंत अशा केवळ 26 केसेस आढळल्या आहेत. Bleeding & clotting cases following COVID vaccination in India are minuscule Says Report
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी देशव्यापी लसीकरण अभियान सुरू आहे. यादरम्यान लसीकरणानंतर रक्त गोठण्याच्या तक्रारी खूप कमी प्रमाणात आढळल्या आहेत. सोमवारी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय एईएफआय समितीच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. यानुसार आतापर्यंत अशा केवळ 26 केसेस आढळल्या आहेत.
समितीने म्हटले की, कोव्हिशील्ड लस घेतल्यानंतर देशात आतापर्यंत रक्त गोठण्याच्या (Bleeding & clotting cases) केवळ 26 केसेस आढळल्या आहेत. त्याच वेळी समितीला कोव्हॅक्सिनसंदर्भात अशी कोणतीही तक्रार आढळलेली नाही. मंत्रालयाने कोव्हिशील्ड लस घेणाऱ्यांसाठी अॅडव्हायजरीसुद्धा जारी केली आणि म्हटले की, लस घेतल्यापासून 20 दिवसांपर्यंत कोणताही त्रास झाला, तर ताबडतोब लसीकरण केंद्रात जा.
सरकार जारी करणार रिपोर्ट
कोरोनाच्या कोणत्याही लसीचा डोस घेतल्यानंतर 20 दिवसांच्या आत संशयित थ्रोम्बोइम्बोलिक लक्षणे आढळल्यास सावध राहण्यासाठी एक सूचना जारी करा. काही देशांमध्ये लसीकरणानंतर विशेषत: अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्ड लस घेतल्यानंतर रक्तस्त्राव आणि गुठळ्या होण्याच्या घटनांमुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशातील कोविन पोर्टलवर 23,000 हून अधिक प्रतिकूल घटनांची सूचना मिळाली होती. यापैकी केवळ 700 केसेस (9.3 केसेस / दर 10 लाख) गंभीर आणि गंभीर स्वरूपाचे म्हणून नोंद झाले.
यापैकी 498 गंभीर प्रकरणांची समीक्षा पूर्ण झाली आहे. त्यापैकी 26 केसेसमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे आढळले. हे सर्व कोव्हिशील्डशी संबंधित होते, परंतु कोव्हॅक्सिनचा डोस घेतल्यानंतर असा कोणताही त्रास झाल्याची नोंद झाली नाही. ब्रिटनमध्ये अशी प्रकरणे दर 10 लाखांत चार आणि जर्मनीमध्ये दर 10 लाखांत 10 असल्याचे आढळून आली आहेत.
Bleeding & clotting cases following COVID vaccination in India are minuscule Says Report
महत्त्वाच्या बातम्या
- न केलेल्या कामाचे श्रेय घेणे अभिनेता सोनू सूदला महागात, ओडिशातील जिल्हाधिकाऱ्यांनी खुलासा करताच नेटकऱ्यांनी घेतले फैलावर
- Central Vista Project : सेंट्रल व्हिस्टाचे बांधकाम रोखण्याच्या याचिकेवर सुनावणी, दिल्ली हायकोर्टाने राखून ठेवला निर्णय
- दिल्लीमध्ये जैशच्या दहशतवाद्याला अटक, साधूच्या वेशात स्वामी नरसिंहानंदांच्या हत्येचा होता कट
- Photos Cyclone Tauktae : चक्रीवादळ तौकतेने केला असा विध्वंस, या फोटोंमधून पाहा विविध शहरांचे हाल
- बिल गेट्स यांचे मायक्रोसॉफ्टच्या महिला कर्मचार्याशी होते अवैध संबंध, कंपनीनेही चालवली होती चौकशी