वृत्तसंस्था
तिरूअनंतपूरम : हमास दहशतवादी संघटनेचा म्होरक्या खालिद मशाल याच्या चिथावणीखोर भाषणानंतर अवघ्या 12 तासांमध्ये केरळमध्ये येहुदी प्रार्थना स्थळावर साखळी बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये 1 ठार 35 जण जखमी झाले आहेत. Blasts in Kerala; 1 killed 35 wounded
केरळमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री विजयन यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडून या घटनेची माहिती घेऊन संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर शाह यांनी घटनास्थळी एनआयए आणि एनएसजीची टीम पाठवली आहे. ही दोन्ही पथकं केरळच्या बॉम्बस्फोटाचा तपास करत असून स्फोटामागचे धागेदोरे शोधून काढत आहेत.
केरळमधील एर्नाकुलम येथील यहुदी प्रार्थना सभेमध्ये एकापाठोपाठ पाच स्फोट झाले. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून 35 लोक जखमी झाले आहेत. यातील 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्फोट झाला तेव्हा तिथे तब्बल 2000 लोक उपस्थित होते.
हमास दहशतवादी संघटनेचा म्होरक्या खालिद मशाल याच्या चिथावणीखोर भाषणानंतर 12 तासानंतर हे स्फोट झाले आहेत. खालिद मशाल याने काल मलप्पूरममध्ये पॅलेस्टाईन समर्थकांच्या रॅलीत व्हर्च्युअल भाषण केले होते. त्यामध्ये त्याने हिंदुत्ववादाविरुद्ध गरळ ओकली होती. भारतातला बुलडोझर हिंदुत्ववाद आणि यहुदी धर्म उद्ध्वस्त केला पाहिजे, अशी दर्पोक्ती त्याने केली होती. खालिद मशालच्या या चिथावणीखोर भाषणानंतर अवघ्या 12 तासांमध्ये स्फोटांची मालिका झाली. त्यातून केरळच्या बॉम्बस्फोटांचे हमासशी कनेक्शन जोडले जात आहे.
गुप्तचर विभागाचा अलर्ट
इस्रायल आणि हमास युद्धा दरम्यान एक अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यात भारतातील ज्यूंशी संबंधित स्थळांना इस्लामी दहशतवादाचा धोका असल्याचं सांगितले होते. एवढेच नव्हे तर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने इसिसच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांनी धक्कादायक माहिती दिली होती. मुंबईच्या छबाड हाऊसमधील ज्यूंच्या एका महत्त्वाच्या स्थळाची बेकायदेशीरपणे रेकी करून त्याचा व्हिडीओ विदेशातील दहशतवाद्यांना पाठवल्याचं या दोघांनी म्हटलं होतं.
दहशतवाद्यांच्या निशाण्यावर ज्यूंची स्थळे
मध्य प्रदेशातील रतलाममध्ये अल सुफा या दहशतवादी संघटनेचे नेटवर्क असल्याचा खुलासा सुरक्षा एजन्सीने केला होता. त्या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर भारतातील ज्यूंची स्थळे होती.
एनआयएकडून तपास सुरू
एनआयएकडून या स्फोटाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. एनआयएची टीम स्फोटाच्या ठिकाणीच राहणार आहे. या घटनेवर मुख्यमंत्री विजयन यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. आम्ही या घटनेशी संबंधित माहिती मिळवत आहोत. सर्व वरिष्ठ अधिकारी एर्नाकुलममध्ये आहेत. डीजीपी घटनास्थळी आहेत. आम्ही हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले आहे, असा दावा विजयन यांनी केला.
Blasts in Kerala; 1 killed 35 wounded
महत्वाच्या बातम्या
- थकीत कर्जाची वसुली संध्याकाळी 7 नंतर बंद; एजंट सकाळी 8 वाजेपर्यंत कॉल करू शकणार नाहीत, RBI ने आणले नवीन नियम
- टाटा समूह भारतात आयफोन बनवणार; टाटाचा विस्ट्रॉनशी 1,000 कोटी रुपयांचा करार, 2.5 वर्षांत सुरू होईल उत्पादन
- काँग्रेसच्या मित्रपक्षांनी सनातन धर्माचा अपमान केला तर बघेल गप्प का बसले?’, भाजपाचा थेट सवाल!
- केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, ”सीमेपलीकडून गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठी घट , मात्र…”