वृत्तसंस्था
चेन्नई : मंगळवारी, 17 ऑक्टोबर रोजी तामिळनाडूतील दोन फटाक्यांच्या कारखान्यांना लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. रंगपालयम आणि किचेनायकनपट्टी गावात हा अपघात झाला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.Blasts at two firecracker factories in Tamil Nadu, 11 dead; 3 lakh each to the families of the deceased
रंगपालयमच्या फटाका कारखान्यात स्फोट झाल्यानंतर ही आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस, अग्निशमन दल आणि बचाव कर्मचार्यांनी आसपासच्या लोकांसह आग विझविली. येथे ढिगाऱ्यातून 7 जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. हे लोक येथे काम करणारे मजूर असू शकतात. या अपघातात तीन जण भाजले. नंतर तिघांचाही मृत्यू झाला.
दुसरी दुर्घटना किचनायकनपट्टी गावातील फटाक्यांच्या कारखान्यात घडली. येथे एकाचा मृत्यू झाला. येथे दोन महिला मजुरांचा जीव वाचला. त्यांना उपचारासाठी श्रीविल्लीपुत्तूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Blasts at two firecracker factories in Tamil Nadu, 11 dead; 3 lakh each to the families of the deceased
महत्वाच्या बातम्या
- इस्रायलने गाझामधील हॉस्पिटलवर केलेल्या हवाई हल्ल्यात, ५०० जणांचा मृत्यू – हमासचा दावा
- पंजाबमध्ये बड्या व्यक्तींच्या हत्येचा कट फसला, चार दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक!
- खर्गेंच्या रूपाने काँग्रेसमध्ये दलित पंतप्रधानांची चर्चा; पण आधी कोणी आणला होता दलित पंतप्रधानांमध्ये अडथळा??
- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याला अर्थ मंत्रालयाने दिली मंजुरी