विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यापाशी झालेल्या प्रचंड मोठ्या स्फोटात 7 गाड्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे चित्र दिसून आले असून 8 जण जागीच ठार झाले. ही बातमी लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कन्फर्म केली. त्यामुळे दिल्लीत दहशतवाद्यांनीच स्फोट घडवून हा हल्ला केल्याचा संशय गडद झाला आहे. एकूण 15 लोकांना जयप्रकाश नारायण रुग्णालयात आणण्यात आले.
गेल्या 3 दिवसांमध्ये पोलिसांनी कारवाई करून तीन दहशतवाद्यांना पकडले होते त्यांच्याकडून 365 किलो स्फोटके त्याचबरोबर काही विषारी द्रव्ये जप्त केली होती. दहशतवाद्यांचे कनेक्शन पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्याबरोबरच चीनशी सुद्धा असल्याचे आढळून आले.
या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास दिल्लीतल्या लाल किल्ल्यापाशी मेट्रो नंबर एक गेटवर एका कार मध्ये प्रचंड मोठा स्फोट झाला त्या स्फोटाच्या हादऱ्याने आजूबाजूच्या 6 गाड्या उद्ध्वस्त झाल्या. जवळ असलेल्या दुकानांच्या आणि इमारतींच्या काचा फुटल्या. सुरुवातीला हा स्फोट केवळ सिलेंडरचा असल्याचे वाटले होते परंतु झालेले नुकसान आणि त्याआधी घडलेल्या घटनाक्रम पाहता दिल्लीत दहशतवाद्यांनी कारमध्ये स्फोट घडवून आणल्याचा संशय गडद झाला.
अग्निशमन दलाच्या 7 गाड्यांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळावर ताबडतोब दाखल झाले. लाल किल्ल्यापाशी गर्दी असणाऱ्या ठिकाणांपासून वाहतूक इतरत्र वळविली. त्याचबरोबर तिथे फॉरेन्सिक टीम दाखल झाली या टीमने स्फोटात उद्ध्वस्त झालेल्या गाड्यांची तपासणी सुरू केली. या स्फोटाची आणि त्या आसपासच्या घटनांची अधिकृत माहिती पोलिसांनी किंवा सरकारी यंत्रणांनी अजून जाहीर केलेली नाही.
Blast near Gate 1 of Red Fort Metro station
महत्वाच्या बातम्या
- Delhi Airport, : दिल्ली विमानतळावर सायबर हल्ल्याचा संशय; NSA ऑफिसमधील मीटिंगनंतर उच्चस्तरीय चौकशी सुरू
- बिहारमध्ये नड्डा यांच्या समवेत एकनाथ शिंदेंचा प्रचाराचा डंका; NDA च्या रेकॉर्डब्रेक सभा
- Kathmandu : दिल्लीनंतर काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड; सायंकाळी 5:30 वाजल्यापासून विमानसेवा थांबली; 100 आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम
- Kupwara : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडात 2 दहशतवादी ठार; घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते; शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांवर गोळीबार