लुधियाना कोर्टात गुरुवारी मोठा स्फोट झाला. यात एक जण ठार, तर दोन जण जखमी झाले. लुधियाना जिल्हा न्यायालयाच्या आवारातील दुसऱ्या मजल्यावरील वॉशरूममध्ये हा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा उच्च तीव्रतेचा स्फोट असल्याचे सांगण्यात येत आहे. Blast in Ludhiana Court, chaos all around, 1 killed, CM Channi said – will not spare the culprits
वृत्तसंस्था
लुधियाना : लुधियाना कोर्टात गुरुवारी मोठा स्फोट झाला. यात एक जण ठार, तर दोन जण जखमी झाले. लुधियाना जिल्हा न्यायालयाच्या आवारातील दुसऱ्या मजल्यावरील वॉशरूममध्ये हा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा उच्च तीव्रतेचा स्फोट असल्याचे सांगण्यात येत आहे. कोर्टरूममध्ये रीडर्सच्या रुमजवळ एक वॉशरूम होते, तिथे स्फोट झाला आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
स्फोट झाला तेव्हा वकिलांसह अनेक लोक न्यायालयाच्या आवारात उपस्थित होते. स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोट इतका जोरदार होता की खालच्या मजल्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. सध्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे. हा स्फोट कोणी आणि कशासाठी केला हे तपासानंतरच समजेल. या स्फोटामुळे संपूर्ण इमारतीचे नुकसान झाले आहे. येत्या काही महिन्यांत पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा वेळी न्यायालयाच्या आवारात असा स्फोट होऊन कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
लुधियानाचे पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी सांगितले की, एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. कोर्टाच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरूममध्ये हा स्फोट झाला. बाथरूम सोबत रेकॉर्ड रूम होती.
बॉम्बविरोधी पथक आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. घाबरण्यासारखे काही नाही. तपासानंतर अधिक तपशील देऊ. सध्या हा परिसर सील करण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचेही वक्तव्य या स्फोटाबाबत आले आहे. ते म्हणाले की, निवडणुका जवळ आल्या की देशविरोधी शक्ती हे प्रकार करत आहेत. आम्ही दोषींना सोडणार नाही. मी घटनास्थळी जात आहे.
Blast in Ludhiana Court, chaos all around, 1 killed, CM Channi said – will not spare the culprits
महत्त्वाच्या बातम्या
- अयोध्येतील जमीन खरेदी प्रकरणी योगींनी कालच दिले चौकशीचे आदेश; आज सामनातून अयोध्याला चोराची आळंदी केल्याचे टीकास्त्र!!
- प्रियांका गांधींच्या मुलांची इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालेली नाहीत; प्राथमिक चौकशीतला निष्कर्ष
- यवतमाळमधील ढोरे कुटुंबात आनंदाचे वातावरण ; पंतप्रधान मोदींकडून नवदाम्पत्याला मिळाले शुभाशीर्वाद